भारताच्या संरक्षण बजेटमध्ये वाढ; 2013-14 च्या तुलनेत अडीचपट वाढ
India-Pakistan Conflict: भारत-पाकिस्तानमध्ये नुकत्याच झालेल्या संघर्षामुळे पाकिस्तानची पुरती दाणादाण उडाली. पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला भारताने सडेतोड उत्तर देत त्यांची जागा दाखवून दिली. विशेष म्हणजे या युद्धसदृश परिस्थितीमुळे पाकिस्तानलाच नव्हे तर संपूर्ण जगालाही भारताची ताकद दिसून आली. भारतीय लष्करी शस्त्रांची ताकद पाहून शत्रू देशालाही घाम फुटला. सुदर्शन एस ४००, ब्रह्मोसपासून ते राफेलपर्यंत, भारताच्या संरक्षण यंत्रणेने आपली ताकद दाखवून दिली आहे.
गेल्या काही वर्षांत भारताने आपल्या संरक्षण तयारीला बळकटी देण्यासाठी आवश्यक पावले उचलल्यामुळेच हे शक्य झाले आहे. देशाच्या संरक्षण बजेटमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. २०१३-१४ या काळात देशाचे संरक्षण बजेट २.५३ लाख कोटी रुपये होते, त्यात आता २०२५-२६ मध्ये ६.८१ लाख कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही वाढ केवळ भारताच्या सुरक्षेबाबतची बांधिलकी दर्शवते असे नाही, तर ‘स्वावलंबी भारत’ या दृष्टिकोनाकडे टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणूनही पाहिले जात आहे.”
धोरणात्मक सुधारणा, खाजगी कंपन्यांची भागीदारी आणि तांत्रिक नवोपक्रमामुळे भारतातील स्वदेशी संरक्षण उत्पादनाला नवीन गती मिळाली आहे. संरक्षण क्षेत्रातील ही वाढ आता केवळ देशाच्या सीमांचे रक्षण करण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर जगासमोर भारताला एक विश्वासार्ह संरक्षण निर्यातदार म्हणूनही ओळखले गेल्याचा विश्वास केंद्र सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारत आता अनेक देशांना संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञान निर्यात करत आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेमुळे देशातील संरक्षण क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढली आहे आणि रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होत आहेत. संरक्षण बजेटमधील ही वाढ केवळ सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची नाही तर देशाच्या आर्थिक विकासातही महत्त्वाची भूमिका बजावत आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. संरक्षण उत्पादनात स्वयंपूर्णतेमुळे आयातीवरील अवलंबित्व कमी होईल, ज्यामुळे परकीय चलनाचीही बचत होईल.
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! PMPML च्या ताफ्यात दाखल होणार आणखी एक हजार बसेस
गेल्या काही वर्षांपासून भारत आपले लष्करी सामर्थ्य सतत वाढवत आहे. राफेल करार असो किंवा इतर कोणताही. भारत आपल्या सैन्याला प्रगत शस्त्रास्त्रांनी सुसज्ज करण्यात अजिबात मागे नाही. सध्या भारताकडे अशी अनेक घातक शस्त्रे आहेत, जी शत्रू सैन्याला उडवून देण्यासाठी पुरेशी आहेत.