bsf (फोटो सौजन्य- social media)
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर गोंधळलेल्या पाकिस्तानकडून सातत्याने भारतावर हल्ल्यांचे प्रयत्न सुरु आहे. परंतु ते हल्ले अयशश्वी ठरत आहे आणि भारताकडून चोख त्या हल्ल्यांचा प्रतिउत्तर देण्यात येत आहे. तरीही पाकिस्तानची मस्ती जिरत नाही आहे.जम्मू काश्मीर मध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठ्या दहशतवादी गटाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सीमा सुरक्षा दलाने (BSF) अत्यंत शौर्याने आणि तत्परतेने ही घुसखोरी थोपवून धरली आहे.
२८ दहशतवाद्यांचा खात्मा
8 आणि 9 मे 2025 च्या मध्यरात्री जम्मू आणि काश्मीरमधील सांबा जिल्ह्याजवळील आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठ्या दहशतवादी गटाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सीमा सुरक्षा दलाने (BSF) अत्यंत शौर्याने आणि तत्परतेने ही घुसखोरी थोपवून धरली. या कारवाईत भारतीय सैन्याने सात दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. आता या पाठोपाठ भारतीय सैन्याकडून २८ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे समोर आले आहे. भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांवर गोळीबार करत असताना पाकिस्तानी सैन्याने भारतीय सैन्यावर गोळीबार केल्याची माहिती समोर येत आहे.
7 मे 2025 रोजी भारतीय लष्कराने “ऑपरेशन सिंदूर” राबवले. यात पाकिस्तानच्या पंजाब प्रांत आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 स्थानांवर हवाई हल्ले करण्यात आले. या हल्ल्यांमध्ये जैश-ए-मोहम्मद (JeM) आणि लष्कर-ए-तैयबा (LeT) या दहशतवादी गटांच्या तळांवर निशाणा साधण्यात आला. भारतीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या कारवाईत किमान 100 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे जाहीर केले आहे.
पाकचे महत्त्वाचे लष्करी तळ उद्ध्वस्त
गेल्या दोन दिवसापासून सलग पाकिस्तान भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले केले, ज्यामध्ये त्यांच्या बहुचर्चित फतेह-1 या क्षेपणास्त्राचाही समावेश होता. या हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने आता ठोस प्रत्युत्तर देण्यास सुरवात केली आहे. शनिवारी सकाळी भारतीय वायूदलाची लढाऊ विमाने पाकिस्तानच्या हवाई हद्दीत प्रवेश करून पाकिस्तानमधील तीन महत्त्वाच्या एअरबेसला टार्गेट करत भारताकडून प्रतिहल्ला करण्यात आला आहे. नूर खान, रफिक आणि मुरिद एअरबेसवर भारतीय लढाऊ विमानांनी अचूक हल्ले चढवले. यात पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.