जम्मू काश्मीरमध्ये तीन दहशतवादी ठार (फोटो- सोशल मिडिया
जम्मू काश्मीर: जम्मू काश्मीरमध्ये एक मोठी बातमी समोर आली आहे. जम्मू काश्मीरमध्ये लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार मारले आहे. ऑपरेशन सिंदूर भारताने यशस्वीपणे राबवले आहे. पाकिस्तानमध्ये घुसून भारताने 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. मात्र पाकिस्तान अजूनही सुधरण्याचे नाव घेत नाहीये. कारण जम्मू काश्मीरच्या त्राल सेक्टरमध्ये लष्कराने तीन दहशतवादी ठार केले आहेत. गेलया दोन दिवसांत 6 दहशतवादी ठार मारले आहेत.
भारतीय लष्कराने पुलवामा येथील त्राल भागात तीन दहशतवाद्यांचा खातमा केला आहे. काल लष्कराने लष्कर ए तोयबाचे तीन दहशतवादी ठार केले आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर भारतानेयकिस्तान आणि दहशतवादाविरोधात मोठे पाऊल उचलले आहे. भारतीय लष्कर आक्रमकपणे दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करत आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर देखील पाकिस्तान सुधरेना
जम्मू-काश्मीरमधून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय लष्कर आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली आहे. या चकमकीत शूर जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ठार मारण्यात आलेले तीन दहशतवादी हे लष्कर ए तोयबाचे असल्याचे समजते आहे.
Jammu-Kashmir: ऑपरेशन सिंदूरनंतर देखील पाकिस्तान सुधरेना! लष्कराने घातले तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
शोपियामध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
दक्षिण काश्मीरच्या शोपीया जिल्ह्यात तीन दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या तीन दहशतवाद्यांनी मोठे नुकसान करण्याचे ठरवले होते. मात्र सुरक्षा दलांनी त्यांना घेरले. त्यानंतर झालेल्या चकमकीत या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर देखील पाकिस्तान सुधारला नसल्याचे दिसून येत आहे. दहशतवादी भारतात पाठवण्याचे सत्र अजूनही थांबलेले दिसत नाहीये. त्यामुळे पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कर सीमेवर अत्यंत सतर्क झाले आहे.
‘शरीफ’ सरकार मसूद अजहरला 14 कोटी देणार?
पाकिस्तानने भारताच्या हल्ल्यात ठार झालेल्या कुटुंबाला मदत करण्याचे ठरवले आहे. कुटुंबाला पाकिस्तानने एक-एक कोटी रुपये देण्याचे ठरवले आहे. भारताच्या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसुद अजहरचे 14 नातेवाईक ठार झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तान कदाचित मसूद अजहरच्या कुटुंबाला 14 कोटी रुपये देण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानने अजहरला 14 कोटी रुपये दिल्यास तो पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा दहशतवादाचा किल्ला उभा करण्याची शक्यता आहे. मसूद अजहर जैश ए मोहम्मदचा प्रमुख आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने जैश ए मोहम्मदचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. यामध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवादी ठार झाले. त्यात अजहरचे 14 नातेवाईक देखील ठार झाले.
पाकिस्तानी सरकार अजहरला 14 कोटी देणार?
पाकिस्तान सरकार मसूद अजहरला 14 कोटी देणार आहे. मसूद अजहर पाकव्याप्त काश्मीरमधून दहशतवादी कारवाया राबवत असे. संयुक्त राष्ट्र संघाने मसूद अजहरला दहशतवादी घोषित केले आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत मसूद अजहरचे सर्वदडे उद्ध्वस्त केले.