इस्रोच्या १०१ व्या मोहिमेला अपयश; EOS-09 सॅटेलाइटचं लॉन्चिंग फेल, नेमकं कारण काय?
भारताची अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोच्या १०१ व्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. PSLV-C61 रॉकेटमधून प्रक्षेपित करण्यात आलेला EOS-09 उपग्रह कक्षेत पोहोचवता आला नाही. प्रक्षेपणानंतर अवघ्या काही मिनिटांत रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्यात बिघाडची माहिती इस्रोने दिली. सुरक्षेसंदर्भात त्वरित माहिती मिळावी यासाठी या उपग्रहाचे प्रक्षेपण महत्त्वाचे मानलं जात होतं.
Earthquake : मध्यरात्री ‘या’ ठिकाणी हादरली जमीन, जाणवले जोरदार भूकंपाचे धक्के
#WATCH | Indian Space Research Organisation (ISRO) launches PSLV-C61, which carries the EOS-09 (Earth Observation Satellite-09) into a SSPO orbit, from Sriharikota, Andhra Pradesh.
EOS-09 is a repeat satellite of EOS-04, designed with the mission objective to ensure remote… pic.twitter.com/4HVMZzXhP0
— ANI (@ANI) May 18, 2025
इस्रोने “आजची १०१ वी मोहीम राबवण्यात आली. PSLV-C61 चे दुसऱ्या टप्प्यापर्यंतचे कार्य सामान्य होते. मात्र तिसऱ्या टप्प्यात निरीक्षणात बिघाड आढळला, त्यामुळे मोहीम पूर्ण करता आली नाही.” असं एका निवेदनात म्हटलं आहे. PSLV हे भारताचे सर्वात यशस्वी प्रक्षेपण यान मानले जाते आणि या यानाने आतापर्यंत ६३ मोहिमा पार पाडल्या आहेत. यापूर्वी केवळ १९९३ मधील पहिली उड्डाण आणि २०१७ मधील C-39 या दोन मोहिमांवेळी PSLV अपयशी ठरले होते.
खाजगी स्पेस कंपनी स्कायरूटचे सह-संस्थापक पवन कुमार चंदना यांनी या अपयशाबद्दल खंत व्यक्त करताना सांगितले, “PSLV च्या अपयशाने मन सुन्न झाले. २०१७ मध्ये C-39 अपयश झाल्यावर इस्रोतील आमचे मनोबल किती खचले होते हे अजूनही आठवते. यावरून हे दर्शवते की अगदी अशा अनुभवी यानांसाठी देखील स्पेसफ्लाइट किती गुंतागुंतीचे आणि कठीण असते”
ही मोहीम PSLV च्या XL प्रकारच्या २७व्या उड्डाणासाठी होती. या रॉकेटमध्ये चार टप्पे असतात. उड्डाणानंतर सुमारे सहा मिनिटांनी, तिसऱ्या टप्प्याच्या दरम्यान, रॉकेटच्या मार्गात विचलन आढळले आणि त्याची उंची अपेक्षेपेक्षा कमी होती. त्यानंतर थेट प्रक्षेपण अचानक थांबवण्यात आले आणि नंतर इस्रोने मोहीम अपयशी झाल्याचे जाहीर केले. ही सलग दुसरी अपयशी मोहीम ठरली आहे. याआधी १०० व्या मोहिमेदरम्यान GSLV रॉकेट NVS-02 उपग्रह योग्य कक्षेत पोहोचवण्यात अयशस्वी ठरले होते.
दिएगो गार्सिया तळावर हल्ल्याची शक्यता; ट्रम्प यांच्या आदेशाने F-15 लढाऊ विमाने तैनात, लक्ष्य कोण?
EOS-09 हा Synthetic Aperture Radar (SAR) ने सुसज्ज उपग्रह असून सर्व हवामानात पृथ्वीची प्रतिमा घेण्यास सक्षम आहे. २०२२ मध्ये प्रक्षेपित झालेल्या EOS-04 सोबत समन्वय साधून कार्य करण्यासाठी तयार करण्यात आला होता. पर्यावरणीय जबाबदारी लक्षात घेऊन, या उपग्रहात त्याच्या आयुष्याच्या शेवटी कक्षेबाहेर टाकण्यासाठी राखीव इंधन ठेवण्यात आले होते जेणेकरून तो पृथ्वीच्या वातावरणात जळून नष्ट होईल. हीच प्रक्रिया रॉकेटच्या शेवटच्या टप्प्यासाठीही नियोजित होती. अंतराळ मोहिमांमध्ये यश आणि अपयश या दोन्हींचा स्वीकार गरजेचा आहे, मात्र ही अपयशाची साखळी इस्रोसमोरील आव्हाने अधिक तीव्र करत आहे.