फोटो सौजन्य- Indian Navy X
भारतीय नौदलाने काल खरंच कौतुकास्पद कामगिरी केली. आपले जवान हे नेहमीच माणूसकीसाठी उभे राहतात याचा प्रत्यय पुन्हा आला. चीन आणि भारत यांच्या प्रचंड संघर्ष अनेक कालावधी पासून सुरु आहे. तो संघर्ष कधी थेट दिसतो कधी छुप्या स्वरुपात असतो. पण या संघर्षाचा परिणाम भारतीय जवानांनी माणूसकीवर पडू दिला नाही. काल (23 जुलै) जेव्हा अरबी समुद्रामध्ये एका जहाजामधून नौदलाला कॉल आला त्यावेळी एक चीनी नागरिक गंभीर जखमी होता. त्याला तात्काळ आपत्कालीन मदतीची गरज होती. त्यावेळी नौदल त्याच्या मदतीला धावून आले.
जहाजामधील चीनी नागरिकाची परिस्थिती चांगली नव्हती त्याचा रक्तस्राव होत होता. त्यावेळी भारतीय नौदलाला कॉल आला आणि भारतीय नौदलाने रेस्क्यू ऑपरेशन सुरु केले. नौदलाचे स्टेशन आएएनएस शिखा वरुन एक हेलीकॉप्टर तिथे पाठविले. त्यावेळी प्रंचड हवा सुरु होती. जहाज ही प्रचंड हलत होते.
#IndianNavy successfully evacuates a Critically injured #Chinese Mariner from Bulk Carrier ZHONG SHAN MEN, 200nm (approx 370km) from #Mumbai.
Maritime Rescue Co-ordination Centre, Mumbai received a distress call on PM #23Jul 24 from the bulk carrier reporting heavy blood loss… pic.twitter.com/FyhlgnEUUR— SpokespersonNavy (@indiannavy) July 24, 2024
नौदलाच्या म्हणण्यानुसार, त्यावेळी 45 नॉट्सपेक्षा जास्त वेगाने वारे वाहत होते. आव्हानात्मक हवामानाबरोबरच जहाजाच्या जोरदार हलत होते. त्यामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले, अशावेळी जहाजावर डेक नसल्यामुळे नौदलाचे हेलीकॉप्टर तिथे उतरू शकत नव्हते. अशा परिस्थितीत नौदलाच्या जवानांनी जखमी चिनी माणसाला जहाजाच्या ब्रिज विंगमधून यशस्वीरित्या एअरलिफ्ट केले. त्यानंतर नौदलाच्या एअर स्टेशनवर सुखरुप नेण्यात आले. त्यानंतर चीनी नागरिकास पुढील वैद्यकीय उपचाराकरिता हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले.
नौदलाने माणूसकीसाठी केलेल्या कामगिरीचे सोशल मिडियासह सर्वत्र कौतुक केले जात आहे. हे ऑपरेशनमध्ये भारतीय नौदलाने मेरिटाइम रेस्क्यू कोऑर्डिनेशन सेंटर यांच्यासोबत संयुक्तरित्या पार पाडले. ज्यामुळे एका नागरिकाचा जीव वाचला गेला.