नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग (फोटो - सोशल मीडिया)
नागपूर: नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इंडिगोच्या फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हे विमान कोचीनवरून दिल्लीकडे चालले होते. मात्र अचानक या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. इंडिगोच्या 6E 2706 फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे.
विमानात बॉम्ब असल्याची धमकी मिळाल्याने या फ्लाइटचे नागपूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. दरम्यान विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे समोर आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळी 9.30 च्या सुमारास कोचीनवरून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोची फ्लाइट 6E 2706 मध्ये बॉम्ब असल्याची धमकी प्राप्त झाली होती. दरम्यान त्यानंतर हे फ्लाइट नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. सध्या विमानाची तपासणी केली जात आहे.
टर्ब्युलन्समुळे इंडिगो फ्लाईटचे इमर्जन्सी लँडिंग
दिल्लीहून श्रीनगरला जाणाऱ्या इंडिगोच्या विमान क्रमांक 6E-2142 मध्ये आज खराब हवामानात तीव्र गोंधळ आणि वीज चमकल्याने गोंधळ उडाला. श्रीनगरवरून विमान जात असताना ही घटना घडली आणि जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील सर्व २२७ प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत आणि विमानाचे श्रीनगर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले होते.
Ahmedabad Plane Crash: कोणत्या कारणांमुळे क्रॅश झाले Air India चे विमान? येत्या 3 महिन्यांत…
कोणत्या कारणांमुळे क्रॅश झाले Air India चे विमान?
अहमदाबाद येथील विमान अपघाताची चौकशी केंद्रीय गृह सचिव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती या दुर्घटनेची चौकशी करणार आहे. तसेच भविष्यात अशा घटना होऊ नयेत म्हणून एसओपी देखील तयार केली जाणार आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने देखील याबाबत एसओपी जारी करणार असल्याचे सांगितले आहे.
ही समिती आपला रिपोर्ट तयार करून तीन महिन्यात नागरी उड्डाण मंत्रालयाला सादर करणार आहे. 12 जून रोजी सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाने उड्डाण घेतले होते. उड्डाण घेतल्यानंतर काही क्षणातच विमान कोसळले. या घटनेची चौकशी अनेक तपास यंत्रणा करत आहेत. एटीएस देखील या घटनेचा तपास करत आहे. विमानातून ब्लॅक बॉक्स आणि डीव्हीआर जप्त केला आहे. त्यामुळए लवकरच हा अपघात नेमका कशामुळे घडला आहे, याचे कारण समोर येणार आहे.