• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Indus Valley Collapsed After 164 Years Of Drought

Indus Valley : ‘5000 वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती अचानक संपली…’; IITटीच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले ऱ्हासामागचे खरे कारण

IIT Gandhi Nagar : शास्त्रज्ञांनी असा दावा केला आहे की प्रगत सिंधू संस्कृती अचानक कोसळली नाही, तर शेकडो वर्षांत दुष्काळ आणि अन्नटंचाईमुळे हळूहळू कोसळली. शास्त्रज्ञांनी आणखी काय उघड केले ते जाणून घ्या.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Nov 30, 2025 | 03:51 PM
Indus Valley collapsed after 164 years of drought

Indus Valley : '5000 वर्षांपूर्वी सिंधू संस्कृती अचानक संपली...'; IITटीच्या शास्त्रज्ञांनी शोधून काढले ऱ्हासामागचे खरे कारण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  1. आयआयटी गांधीनगरच्या नव्या संशोधनानुसार सिंधू संस्कृती अचानक नष्ट न होता सुमारे 164 वर्षे चाललेल्या तीव्र दुष्काळामुळे हळूहळू कोसळली.
  2. मान्सून कमकुवत होणे, पावसात 10–20% घट आणि तापमानात 0.5 अंशांची वाढ ही या विनाशाची प्रमुख कारणे ठरली.
  3. पाण्याच्या टंचाईमुळे शेती, अन्नपुरवठा, लोकसंख्या आणि शहरे उद्ध्वस्त झाली आणि महान नागरी संस्कृती छोट्या जमातींमध्ये विखुरली.
Harappan civilisation decline : भारत (India) आणि पाकिस्तानात (Pakistan) पसरलेली जगातील सर्वात प्रगत आणि सुव्यवस्थित प्राचीन संस्कृती म्हणून ओळखली जाणारी सिंधू संस्कृती कशी आणि का नष्ट झाली, हा प्रश्न अनेक दशकांपासून संशोधकांसाठी कोडं ठरलेला होता. पूर, भूकंप, आक्रमण, साथीचे रोग किंवा उल्कापात अशा अनेक सिद्धांतांतून या संस्कृतीच्या विनाशाची कारणे शोधण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता आयआयटी गांधीनगरच्या संशोधकांनी केलेल्या नव्या अभ्यासामुळे या गूढावर मोठ्या प्रमाणात प्रकाश पडला आहे. या संशोधनानुसार सिंधू संस्कृती अचानक नष्ट झाली नाही, तर शेकडो वर्षे चाललेल्या दुष्काळ, हवामान बदल आणि पाण्याच्या टंचाईमुळे ती हळूहळू कोलमडली.

आयआयटी गांधीनगरचे हवामान शास्त्रज्ञ डॉ. विमल मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या ११ पानी संशोधनात असे आढळून आले की जवळजवळ दोन शतके चाललेल्या दुष्काळाने या प्रगत नागरी संस्कृतीचे मूळच उखडले. विशेष म्हणजे, यामध्ये एक दुष्काळ तब्बल 164 वर्षे टिकला होता. इतक्या दीर्घकाळ पावसाअभावी सिंधू खोऱ्यातील नद्या आटल्या, जमिनी सुपीक राहिल्या नाहीत आणि शेती पूर्णपणे कोलमडली. अन्नाची कमतरता निर्माण झाली आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोकांचे स्थलांतर झाले.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Shadow Fleet : ‘हा VIRATआहे, आम्हाला मदत हवी आहे, मेडे…मेडे’; रशिया युक्रेनचा ब्लॅक सीमध्ये युद्ध थरार, तुर्की मात्र अनभिज्ञ

संशोधनातून असे स्पष्ट होते की सिंधू संस्कृती पूर्णत: मान्सूनवर आणि सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून होती. मात्र हवामान पद्धतींमध्ये बदल झाल्यामुळे पर्जन्यमानात 10 ते 20 टक्क्यांपर्यंत घट झाली, तर परिसरातील सरासरी तापमान सुमारे 0.5 अंशांनी वाढले. याचा थेट परिणाम शेतीवर झाला. गहू, बार्ली आणि इतर प्रमुख धान्यांचे उत्पादन घटले. शेतकरी पर्यायी पिकांकडे वळले, मात्र ते प्रयोगही अयशस्वी ठरले. परिणामी संपूर्ण अन्नसाखळी कोलमडली.

या हवामान बदलामागे महासागरांचे तापमान देखील जबाबदार होते. उत्तर अटलांटिक महासागर थंड होत गेला आणि त्याचा परिणाम भारतीय मान्सूनवर झाला. त्याचवेळी पॅसिफिक आणि हिंदी महासागराच्या वाढत्या तापमानामुळे पृथ्वीवरील तापमानाचा समतोल बिघडला आणि मान्सून आणखी कमकुवत झाला. यामुळे पावसाचे प्रमाण अधिकच घटले आणि सिंधू खोऱ्यातील जलस्रोत हळूहळू कोरडे पडले.

A series of lengthy droughts brought about the fall of the Indus Valley Civilization, a new study finds. https://t.co/TTQ8QfdTUv — Live Science (@LiveScience) November 27, 2025

credit : social media and Twitter 

हडप्पा, मोहेंजो-दारो, लोथल आणि राखीगढी यासारखी प्रगत शहरे हे नागरी नियोजन, जलव्यवस्थापन आणि व्यापाराचे उत्कृष्ट उदाहरण होती. मात्र पाण्याशिवाय कोणतीही संस्कृती टिकू शकत नाही. हळूहळू लोकसंख्या कमी झाली, व्यापारी मार्ग बंद पडले आणि विशाल शहरे लहान गावांमध्ये आणि जमातींमध्ये रूपांतरित झाली. अशा प्रकारे एका कालखंडात जगाला दिशा देणारी सिंधू संस्कृती काळाच्या पडद्याआड गेली.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Plane Crash : आकाशात मृत्यूचा थरार! दोन विमानांची समोरासमोर भीषण टक्कर; झुडुपांमध्ये आढळला पायलटचा मृतदेह

या संशोधनाला केवळ ऐतिहासिक नव्हे, तर आजच्या काळातील इशारा म्हणूनही पाहिले जात आहे. आज जगभरात वाढते तापमान, पावसाची अनिश्चितता आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई ही समस्या गंभीर होत असताना, सिंधू संस्कृतीचा अंत हे मानवजातीसाठी एक मोठे धोक्याचे संकेत देणारे उदाहरण ठरत आहे. पर्यावरण संतुलन बिघडल्यास अत्याधुनिक संस्कृतीसुद्धा कसा नष्ट होऊ शकते याचे हे जिवंत उदाहरण आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: सिंधू संस्कृती अचानक का नष्ट झाली नाही?

    Ans: ती अचानक नाही तर 164 वर्षे चाललेल्या तीव्र दुष्काळामुळे आणि हवामान बदलामुळे हळूहळू कोसळली.

  • Que: या संशोधनामागे कोणती संस्था आहे?

    Ans: आयआयटी गांधीनगरच्या शास्त्रज्ञांनी, डॉ. विमल मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन केले आहे.

  • Que: हे संशोधन आजसाठी महत्त्वाचे का आहे?

    Ans: आजचा हवामान बदल आणि पाण्याची समस्या भविष्यातील संस्कृतींसाठी धोका ठरू शकते, याचा स्पष्ट इशारा हे संशोधन देते.

Web Title: Indus valley collapsed after 164 years of drought

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 03:51 PM

Topics:  

  • india
  • international news
  • pakistan
  • sindhu river

संबंधित बातम्या

World News: पाकिस्तानचे वाजले बारा! ‘या’ महत्वाच्या प्रांतात IED चा ब्लास्ट; एसएचओ अन् 6 पोलिस जखमी
1

World News: पाकिस्तानचे वाजले बारा! ‘या’ महत्वाच्या प्रांतात IED चा ब्लास्ट; एसएचओ अन् 6 पोलिस जखमी

Most powerful countries: शक्तिशाली देशांच्या क्रमवारीतून भारत बाहेर! कशी ठरते जागतिक महासत्तांची यादी?
2

Most powerful countries: शक्तिशाली देशांच्या क्रमवारीतून भारत बाहेर! कशी ठरते जागतिक महासत्तांची यादी?

India-Germany Trade: जर्मनीशी करार उघडेल युरोपचा दरवाजा? भारताची मोठी आर्थिक रणनीती
3

India-Germany Trade: जर्मनीशी करार उघडेल युरोपचा दरवाजा? भारताची मोठी आर्थिक रणनीती

Modi-Trump: ‘भारतासारखं दुसरं कोणीच नाही…’ संपूर्ण जगाला युद्धात ओढून ट्रम्पचे सहकारी का गात आहेत PM मोदींच्या मैत्रीचे गोडवे?
4

Modi-Trump: ‘भारतासारखं दुसरं कोणीच नाही…’ संपूर्ण जगाला युद्धात ओढून ट्रम्पचे सहकारी का गात आहेत PM मोदींच्या मैत्रीचे गोडवे?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
तिळगुळासारखा गोडवा आयुष्यात टिकून राहो…!  मकर संक्रांतीनिमित्त नातेवाईकांना पाठवा मराठमोळ्या गोड शुभेच्छा

तिळगुळासारखा गोडवा आयुष्यात टिकून राहो…! मकर संक्रांतीनिमित्त नातेवाईकांना पाठवा मराठमोळ्या गोड शुभेच्छा

Jan 14, 2026 | 05:30 AM
शरीरात ही ७ लक्षणे दिसली तर सावध व्हा! डायबिटीज होण्याची अफाट शक्यता

शरीरात ही ७ लक्षणे दिसली तर सावध व्हा! डायबिटीज होण्याची अफाट शक्यता

Jan 14, 2026 | 04:15 AM
“… हे भूगोलशास्त्रासमोरील मोठे आव्हान”; Pune University मधील डॉ. अमित धोर्डेंचा ‘नवराष्ट्र’शी संवाद

“… हे भूगोलशास्त्रासमोरील मोठे आव्हान”; Pune University मधील डॉ. अमित धोर्डेंचा ‘नवराष्ट्र’शी संवाद

Jan 14, 2026 | 02:35 AM
India’s rabies vaccine : भारताच्या रेबीज लसीमध्ये असे आहे तरी काय? ज्यामुळे परदेशात होतोय विरोध

India’s rabies vaccine : भारताच्या रेबीज लसीमध्ये असे आहे तरी काय? ज्यामुळे परदेशात होतोय विरोध

Jan 14, 2026 | 01:15 AM
इराणचा मोठा डाव! रशिया-चीन नव्हे, तर ‘या’ NATO देशासोबत केला गुप्त करार, अमेरिका-इस्रायलला झटका

इराणचा मोठा डाव! रशिया-चीन नव्हे, तर ‘या’ NATO देशासोबत केला गुप्त करार, अमेरिका-इस्रायलला झटका

Jan 13, 2026 | 11:23 PM
MI vs GT, WPL Live Score : हरमनप्रीत कौरच्या वादळी खेळीने GT कडून विजय हिसकावला! MI चा 7 विकेट्सने थरारक विजय 

MI vs GT, WPL Live Score : हरमनप्रीत कौरच्या वादळी खेळीने GT कडून विजय हिसकावला! MI चा 7 विकेट्सने थरारक विजय 

Jan 13, 2026 | 11:06 PM
TECH EXPLAINED: फोनच्या स्क्रीनची साईज कशी मोजतात? असा आहे स्मार्टफोन कंपन्यांचा अनोखा फंडा, जाणून घ्या

TECH EXPLAINED: फोनच्या स्क्रीनची साईज कशी मोजतात? असा आहे स्मार्टफोन कंपन्यांचा अनोखा फंडा, जाणून घ्या

Jan 13, 2026 | 10:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Akola News : उबाठा आणि प्रहार पक्षाच्या युतीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक प्रचार, भाजपवर सडकून टीका

Akola News : उबाठा आणि प्रहार पक्षाच्या युतीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक प्रचार, भाजपवर सडकून टीका

Jan 13, 2026 | 08:03 PM
महाराष्ट्राचं लक्ष अहिल्यानगरात, BJP  राष्ट्रवादी युतीच्या प्रचारात प्रचंड गर्दी, पाहा व्हिडीओ

महाराष्ट्राचं लक्ष अहिल्यानगरात, BJP राष्ट्रवादी युतीच्या प्रचारात प्रचंड गर्दी, पाहा व्हिडीओ

Jan 13, 2026 | 07:48 PM
Kolhapur :  “महायुतीला धास्ती त्यामुळे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना कोल्हापूरात यावं लागलं” – सतेज पाटील

Kolhapur : “महायुतीला धास्ती त्यामुळे मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्र्यांना कोल्हापूरात यावं लागलं” – सतेज पाटील

Jan 13, 2026 | 07:27 PM
Pune Election : प्रभाग 25 मधील प्रश्न का सुटले नाही? काँग्रेसचे उमेदवार निरंजन दाभेकर यांचा सवाल

Pune Election : प्रभाग 25 मधील प्रश्न का सुटले नाही? काँग्रेसचे उमेदवार निरंजन दाभेकर यांचा सवाल

Jan 13, 2026 | 07:19 PM
Nashik Election :  महानगरपालिकेत तिहेरी लढत, राष्ट्रवादीबाबत काय म्हणाले समीर भुजबळ?

Nashik Election : महानगरपालिकेत तिहेरी लढत, राष्ट्रवादीबाबत काय म्हणाले समीर भुजबळ?

Jan 13, 2026 | 07:13 PM
Mira Bhayandar : भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन‘भाजपाचाच महापौर होणार’ हसमुख गहलोत यांचा ठाम दावा

Mira Bhayandar : भाजपाचे जोरदार शक्तिप्रदर्शन‘भाजपाचाच महापौर होणार’ हसमुख गहलोत यांचा ठाम दावा

Jan 13, 2026 | 01:43 PM
Thane News : घोडबंदरमध्ये इंग्रजी बॅनरवरून राजकारण तापले; मनसे-उबाठावर विरोधकांचा हल्लाबोल

Thane News : घोडबंदरमध्ये इंग्रजी बॅनरवरून राजकारण तापले; मनसे-उबाठावर विरोधकांचा हल्लाबोल

Jan 12, 2026 | 07:14 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.