पोलिसांनी मोर्चा अडवला,राहुल, प्रियांका गांधींसह खासदारांना ताब्यात घेतले...; दिल्लीत राजकारण तापणार
LiveUnstoppable: राजधानी दिल्लीतील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या मतचोरीच्या आरोपांनंतर आज इंडिया आघाडीने मोर्च्याचे आयोजन केलं आहे. इंडिया आघाडीच्या ३०० खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगापर्यंत मोर्चा काढण्यास सुरूवात केली. पण पोलिसांनी हा मोर्चा मध्येच अडवला. अनेक खासदांनाही त्यांच्या हातात ‘ सेव्ह व्होट’चे बॅनर्स हाती घेतले आहेत. पण दिल्ली पोलिसांनी इंडिया आघाडीचा मोर्चा अडवला.
इंडिया आघाडीच्या 300 खासदारांनी मकर द्वार ते निवडणूक आयोग कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यास सुरुवात केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अडवला. खासदारांनी हातामध्ये ‘सेव्ह व्होट’चे बॅनर्सच हाती घेतले होते. पण पोलिसांनी या मोर्चाला परवानही दिली नाही. पोलिसांनी संसदेच्या आवारातच इंडिया आघाडीचा मोर्चा रोखल्याने खासदार चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. खासदारांनी आवारातच पोलिसांनी राहुल गांधी, प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांच्यासह अनेक खासदारांना ताब्यात घेतलं.
तृणमुल काँग्रेसच्या महिला खासदारही चांगल्याच आक्रमक झाल्या. अनेकजणी तर थेट पोलिसांच्या बॅरिकेट्सवर चढून निषेध नोंदवू लागल्या. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव तर बॅरिकेट्सवर चढून थेट बाहेर पडले आणि निघाले. पण त्यानांही ताब्यात घेण्यात आले. संविधान वाचवण्यासाठी आमची लढाई सुरू असल्याचे मत राहुल गांधींनी व्यक्त केलं, तर प्रियांका चतुर्वेदी यांनीही निवडणूक आयोगावर निशाणा साधला. मतांची चोरी होत आहे. भाजपच्या आदेशानुसार कामे सुरू आहेत, आम्ही प्रश्न उपस्थित करत आहोत तर निवडणूक आयोग आमच्यापासून पळ काढत आहे. आम्ही चोर नाही आहोत. देशाविरोधात नाही तर देश हितासाठी आम्ही बोलत आहोत पण आयोग उत्तर देण्यापासून पळ काढत आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्ही शांतता मार्गाने लढत राहणार आहोत. महात्मा गांधीच्या मार्गाने आम्ही पुढे लढत राहु. याशिवाय खासदार डिंपल यादव यांनीदेखील आयोगावर हल्लाबोल केला. ज्यापद्धतीने मतांची चोरी होत आहे. निवडणुका, उपनिव़णुकांमध्ये ज्या पद्धतीने मतांचा आकडा वाढला आहे. ७७ टक्क्यांपर्यंत मतांचा टक्का वाढला आहे. भाजपच्या मतांचा टक्का ७७ टक्क्यांपर्यंत एवढा वाढला कसा, असा प्रश्न डिंपल यादव यांनी उपस्थित केला. त्यामुळे निवडणूक आयोग डोळे झाकून बसले आहे, हेच दिसून येते, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, “जर सरकार निवडणूक आयोगाच्या कार्यालयात प्रवेश देत नसेल, तर त्यांना कशाची भीती आहे हे समजत नाही. हा शांततापूर्ण निषेध आहे.” निषेधादरम्यान तृणमूल काँग्रेसच्या खासदार मिताली बाग बेशुद्ध पडल्या. त्यांना पोलिसांनी तातडीने ताब्यात घेतले. राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी त्यांची विचारपूस करून काळजी घेतली. काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांनी पदयात्रेत म्हटले, “आम्ही फक्त विचारत आहोत की इतक्या कमी वेळात मतदार यादीत इतक्या लोकांची नावे कशी समाविष्ट झाली. याचे उत्तर दिले जात नाही. आमची मते चोरीला जात आहेत.”
३० जणांना निवडणूक आयोगाकडे जाण्याची परवानगी देण्यात आली – दिल्ली पोलिस
नवी दिल्लीचे डीसीपी देवेश कुमार महाला म्हणाले, “आम्ही निवडणूक आयोगाच्या सतत संपर्कात होतो आणि निवडणूक आयोगाने आम्हाला पत्र पाठवले होते. त्यांनी सांगितले होते की पक्षातील कोणतेही ३० जण निवडणूक आयोगाकडे येऊ शकतात, परंतु २०० हून अधिक नेते येथे आले होते. सुरक्षा आणि कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्यांना रोखण्यात आले. काही खासदारांनी बॅरिकेड ओलांडण्याचा प्रयत्नही केला होता.”
पाहा व्हिडीओ-
#WATCH | Delhi: Samajwadi Party chief Akhilesh Yadav jumps over a police barricade as Delhi Police stops INDIA bloc leaders marching from the Parliament to the Election Commission of India to protest against the Special Intensive Revision (SIR) of electoral rolls in poll-bound… pic.twitter.com/X8YV4mQ28P
— ANI (@ANI) August 11, 2025
#WATCH | Delhi: Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, “The reality is that they cannot talk. The truth is in front of the country. This fight is not political. This fight is to save the Constitution. This fight is for One Man, One Vote. We want a clean, pure voters… pic.twitter.com/Aj9TvCQs1L
— ANI (@ANI) August 11, 2025
#WATCH | Delhi: Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, “The reality is that they cannot talk. The truth is in front of the country. This fight is not political. This fight is to save the Constitution. This fight is for One Man, One Vote. We want a clean, pure voters… pic.twitter.com/Aj9TvCQs1L
— ANI (@ANI) August 11, 2025