हिमाचल प्रदेशमध्ये बसचा मोठा अपघात (फोटो- सोशल मीडिया)
हिमाचल प्रदेशमध्ये बसला अपघात
डोंगर कोसळल्याने 15 प्रवाशांचा मृत्यू
अत्यंत वेगाने बचावकार्य सुरू
Bilaspur Accident: हिमाचल प्रदेशमध्ये एक मोठी घटना घडली आहे. हिमाचल प्रदेशच्या बिलासपुर येथे बसला मोठा अपघात झाला आहे. बिलासपुर जिल्ह्यात भालू येथे एका खाजगी बसला अपघात झाला आहे. या ठिकाणी बसवर डोंगर कोसळला आहे. यामध्ये तब्बल 15 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार या बसमध्ये एकूण 30 प्रवासी प्रवास करत होते. गेले काही दिवस हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. दरम्यान या बसवर डोंगर कोसळला. त्यामध्ये संपूर्ण बसचा चक्काचूर झाल्याचे समजते आहे. मलब्याखाली अनेकजण अडकले आहेत. जवळपास 15 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे.
बिलासपुर बस हादसा: स्थानीय मीडिया के अनुसार अब तक 10 से अधिक शव निकाले जा चुके हैं जबकि 2 बच्चों को जीवित निकाल लिया गया है। बचाव कार्य अभी भी जारी है। #HimachalPradesh #bilaspurbusaccident pic.twitter.com/q1IPy3yqqO — Arpit shukla ✍🏽 (@JournoArpit) October 7, 2025
घटनेची माहिती मिळताच प्रशासन, अग्निशमन दल, पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. अत्यंत वेगाने बचावकार्य केले जात आहे. मलबा हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हा अपघात घडला तेव्हा बसमध्ये 30 प्रवासी असल्याचे समोर येत आहे. बस जेव्हा बर्थी येथून जात असताना बसवर मातीचा ढिगारा आणि दगड पडले.
बिलासपुर ज़िला के झंडूता विधानसभा क्षेत्र के बालूघाट (भल्लू पुल) के पास हुए भीषण भूस्खलन की ख़बर ने मन को भीतर तक झकझोर दिया है।
इस भारी भूस्खलन में एक प्राइवेट बस के चपेट में आने से 10 लोगों के निधन का दु:खद समाचार मिला है और कई अन्य के मलबे में दबे होने की आशंका है। रेस्क्यू… pic.twitter.com/GBZslb36CP — Sukhvinder Singh Sukhu (@SukhuSukhvinder) October 7, 2025
मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू बिलासपुर येथे घडलेल्या घटनेची गंभीर दखल घेतली. या घटनेबाबत त्यांनी तीव्र शोक व्यक्त केला. घटनास्थळी मदत व बचावकार्य वेगाने करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली. पीडित कुटुंबाच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू सातत्याने जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहेत. तसेच मदतकार्य आणि बचावकार्य वेगाने करण्याचे निर्देश दिले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले आहेत. त्यांच्यावर उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लखनऊमध्ये भीषण अपघात! अनियंत्रित होऊन बस उलटली
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या काकोरी परिसरात गुरुवारी (आज) एक मोठा रस्ते अपघात झाला. गोलाकुआं गावाजवळ कैसरबाग डेपोची रोडवेज बस हरदोईहून लखनऊच्या दिशेने जात असताना अचानक अनियंत्रित होऊन एका खोल दरीत उलटली. एका टँकरची धडक बसल्याने बसवरील नियंत्रण सुटल्याचे सांगितले जात आहे. या भीषण अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला असून, सुमारे डझनभर प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बसच्या खाली दबलेल्या प्रवाशांना पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.
प्रत्यक्षदर्शींच्या मते, बस खूप वेगात होती. काकोरीच्या गोलाकुआं गावाजवळ बसची एका टँकरसोबत जोरदार धडक झाली. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस सुरुवातीला रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या काही लोकांना धडकली आणि त्यानंतर २० फूट खोल दरीत जाऊन उलटली. अपघात इतका भीषण होता की परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच काकोरी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले.