मणीपुरमध्ये लष्कराच्या ताफ्यावर हल्ला (फोटो- ani)
मणीपुरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला
भारतीय लष्कराच्या ताफ्यावर हल्ला
अनेक जवान जखमी झाल्याचे माहिती
Manipur Army Attack: मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार पेटला आहे. आसाम रायफल्सच्या जवानांवर भीषण हल्ला झाला आहे. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले आहेत. तर अनेक जवान जखमी झाल्याचे समजते आहे. मणिपूरमध्ये आसाम रायफल्सच्या जवानांवर अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात अनेक जवान जखमी झाले आहेत.
अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करताच लष्कराने देखील त्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले आहे. लष्कराने देखील गोळीबार सुरू केला आहे. सर्च ऑपरेशन राबवले जात आहे. हा हल्ला संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास झाला. हा हल्ला झाला तेव्हा आसाम रायफल्सचा ताफा बिष्णूपुरकडे जात होती.
मणिपूरमध्ये पुन्हा उफाळला हिंसाचार; PM मोदींच्या दौऱ्यानंतर चुराचंदपूरमध्ये RAFवर दगडफेक
या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना जवळील रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यानंतर घटनास्थळी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. हा हल्ला अचानकपणे झाल्याचे प्राथमिक माहिती म्हटले जात आहे. मोठ्या संख्येने आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार सैनिकांच्या ताफ्यावर सुरू केला. यामध्ये 2 जवान शहीद झाले आहेत. तर अनेक जवान जखमी झाले आहेत.
या हल्ल्यानंतर आसाम रायफल्सने या संपरून परिसराला वेढा घातला आहे. स्थानिक पोलिस आणि लष्कराने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
PM मोदींच्या दौऱ्यानंतर चुराचंदपूरमध्ये RAFवर दगडफेक
मागील काही वर्षे मणिपूर हे जळत असून जातीय हिंसाचार वाढला आहे. यामध्ये अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार कमी करण्यास आणि शांतता प्रस्थापित करण्यात सुरक्षा दलाला यश आले होते. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूर दौरा देखील केला. मात्र पंतप्रधानांचा दौरा झाल्यानंतर पुन्हा एकदा हिंसाचार उफाळला आहे.
PM Modi Manipur Visit: “माझे तुम्हाला वचन आहे, मी….; मणिपूर दौऱ्यात नरेंद्र मोदींचे सूचक विधान
गेल्या दोन वर्षांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या वांशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चुराचंदपूरला भेट दिली. दोन वर्षांनंतर मणिपूरला त्यांचा हा पहिलाच दौरा होता. एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी राज्यातील लोकांच्या धाडसाचे आणि संयमाचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी निघताच मणिपूरमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला. भेटीनंतर राज्यातील त्याच जिल्ह्यात हिंसाचार उफाळला. यादरम्यान रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) च्या जवानांवरही दगडफेक करण्यात आली. प्रशासनाने ताब्यात घेतलेल्या दोन तरुणांना सोडल्यानंतर परिस्थिती सामान्य होत आहे.