File photo : Air India
नवी दिल्ली : एअर इंडिया (Air India) या विमान कंपन्यांचे अनेक कर्मचारी एकाच वेळी सामूहिक रजेवर गेले आहेत. या कर्मचाऱ्यांनी अचानकपणे रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्याने एअर इंडियाचे तब्बल 70 उड्डाणं रद्द करण्याची वेळ कंपनीवर आली आहे.
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी अचानकपणे रजेवर जाण्याचा हा निर्णय घेतल्याने अनेक विमानांची उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. या सर्व गोष्टींचा प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. या कर्मचाऱ्यांनी सुट्टीवर जाताना आजारपणाचं कारण दिलं आहे. त्यामुळे हे कर्मचारी अचानक सुट्टीवर गेल्याने कंपनीला उड्डाणं कसे करायचा हा प्रश्न पडला आहे.
दरम्यान, विमानाने प्रवास करणारा मोठा वर्ग आहे. त्यात एअर इंडिया, इंडिगो, विस्तारा, स्पाईसजेट यांसारख्या विमान कंपन्यांकडून प्रवासी सेवा दिली जाते. असे असताना आता एअर इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सामूहिक जाण्याचा निर्णय घेतला आहे.






