राजस्थानात काँग्रेसला बसणार मोठा धक्का; डझनभर नेतेमंडळी करणार भाजपमध्ये प्रवेश

गहलोत सरकारमध्ये मंत्री राहिलेले लालचंद कटारिया आणि राजेंद्र यादव यांच्यासह अर्धा डझन नेते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, हा मोठा काँग्रेसला धक्का मानला जात आहे. कटारिया आणि सचिन पायलट गटाचे हे नेते रविवारी भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सांगण्यात येत आहे.

    जयपूर : गहलोत सरकारमध्ये मंत्री राहिलेले लालचंद कटारिया आणि राजेंद्र यादव यांच्यासह अर्धा डझन नेते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, हा मोठा काँग्रेसला धक्का मानला जात आहे. कटारिया आणि सचिन पायलट गटाचे हे नेते रविवारी भाजपमध्ये प्रवेश करतील, असे सांगण्यात येत आहे.

    लालचंद कटारिया, राजेंद्र यादव हे गहलोत सरकारमध्ये मंत्री होते. माजी आमदार खिलाडी लाल बैरवा रविवारी सकाळी 11 वाजता भाजपात प्रवेश करू शकतात. माजी आमदार रिक्षपाल मिर्धा आणि विजयपाल मिर्धा हे देखील भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत.

    आलोक बेनिवाल हेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. अनेक जिल्हाप्रमुख, प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, सरपंचही सहभागी होणार आहेत. सकाळी 11 वाजता राज्य मुख्यालयात भाजपचे सदस्यत्व घेणार आहेत. हे सर्व नेते मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आणि प्रदेशाध्यक्ष सीपी जोशी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.