नवी दिल्ली – कुख्यात गँगस्टर लॉरेन्स टोळीने पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर आता वडिलांना धमकी दिली आहे. लॉरेन्स टोळीच्या शूटरच्या नावाने पाठवलेल्या मेलमध्ये लिहिले आहे की मुसेवाला यांचे वडील बलकौर सिंह यांनी लॉरेन्स आणि जग्गू भगवानपुरिया यांच्या सुरक्षेबाबत काहीही बोलू नये. मुसेवालाची हत्या करणारे शूटर जगरूप रूपा आणि मनप्रीत मन्नू यांचे एन्काउंटरही मुसेवाला यांच्या वडिलांच्या दबावाखाली झाल्याचे टोळीने म्हटले आहे. ही धमकी समोर येताच पंजाब पोलिसांनी गुप्त तपास सुरू केली आहे.
शूटर एजे लॉरेन्सच्या नावाने ही धमकी सिद्धू मुसेवाला यांच्या ई-मेल आयडीवर पाठवण्यात आली आहे. हा इशारा सोपू ग्रुपने दिला आहे. धमकी देणाऱ्याने लिहिले – “सुनो सिद्धू मुसेवाला के बाप, लॉरेन्स, जग्गू भगवानपुरिया आमच्या भावांच्या सुरक्षेबाबत काही बोललास तुला काही कळण्याच्या आत मारून निघून जाऊ. तू आणि तुझा मुलगा या देशाचे मालक नाहीत. तुम्हाला वाटेल त्याला सुरक्षा मिळणार नाही. तुच्या मुलाने आमच्या भावांना मारले आणि आम्ही तुझ्या मुलाला मारले. मनप्रीत मन्नू आणि जगरूप रूपा यांचे फेक एन्काउंटर झाल्याचे आम्ही विसरलेलो नाहीत. तूसुद्धा विसरू नको कारण हे सर्व तुझ्या दबावाखाली घडले आहे. तुलाच एकच सांगतो, जास्त बोललात तर तुझी स्थिती सिद्धूपेक्षा वाईट होईल.”