राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीला (फोटो- सोशल मिडिया)
नवी दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकार चांगलेच आक्रमक झाले आहे. भारताने अनेक निर्णय घेऊन पाकिस्तानची कोंडी केली आहे. त्यातच आता पाहलगं हल्ल्यानंतर राजधानी दिल्लीत महत्वाच्या घटना घडत आहेत. रोज महत्वाच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. दरम्यान आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पंतप्रधान मोदी यांच्या भेटीसाठी पीएमओ ऑफिसमध्ये दाखल झाले आहेत.
उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी पंतप्रधान कार्यालयात दाखल झाले आहेत. त्यामुळे राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये पहलगाम हल्ल्याविषयी चर्चा होणार की अन्य कोणत्या विषयांवर ते काही वेळाने स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
भारताची पाकिस्तानवर ‘वॉटर स्ट्राईक
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. भारताने अनेक धोरणात्मक निर्णय घेत पाकिस्तानची चांगलीच कोंडी केली आहे. सिंधू जल करार स्थगित केल्यापासून पाकिस्तानची बोबडी वळली आहे. वाघा बॉर्डर बंद करण्यात आली आहे. व्यापार बंद करण्यात आला आहे. मात्र आता भारताने पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केली आहे. भारताने चिनाब नदीचे पाकिस्तानकडे जाणारे पाणी बंद केले आहे. बगलिहार धंरणाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
पहलगाम हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर भारत सरकार चांगलेच आक्रमक झाले आहे. भारताने कोणतीही सैन्य कारवाई न करता पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. सिंधू जल करार स्थगित केल्याने पाकिस्तान चवताळला आहे. भारताने आता वॉटर स्ट्राईक करत चिनाब नदीवर असलेले बगलिहार धरणाचे पाणी अडवले आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या अनेक भागात पाणीटंचाई होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला पाण्यासाठी वणवण करावी लागणार आहे.
चिनाब नदीचे पाणी अडवल्याने पाकिस्तानच्या पंजाब आणि सिंध प्रांतात पाण्याची अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे. भारताच्या या कारवाईने पाकिस्तानची अडचण होणार आहे. जर का भारताने झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचे देखील दरवाजे बंद केले तर पाकिस्तानचे पाण्याविना हाल होणार आहेत.
बगलिहार डॅम बंद करण्याचा फायदा भारतालाच
पहलगाम हल्ल्याचा बदल घेण्यासाठी भारताने सिंधू जल करार स्थगित केला आहे. तसेच चिनाब नदीचे पाकिस्तानमध्ये जाणारे पाणी अडवले आहे. त्यामुळे पाकिस्तानचे हाल होणार आहेत. मात्र पाणी अडवण्याचा फायदा भारतालाच होणार आहे. बगलिहार धनर चिनाब नदीवर आहे. जे भारतासाठी आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचे आहे. धरणाचे दरवाजे बंद करण्याचा फायदा भारताला होणार आहे. यामुळे जम्मू-काश्मीर मधील विजेचे उत्पादन वाढणार आहे. या भागात थंडीच्या काळामध्ये विजेचा तुटवडा निर्माण होतो. मात्र आता संपूर्ण पाणी भारत वापरणार असल्याने या ठिकाणी विजेचा तुटवडा निर्माण होणार नाही.