भोपाळ : लग्न झालेल्या सख्ख्या मुलीनं तिच्या जन्मदात्या आई-बापांवर आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या भावावर केलेल्या अत्याचाराची (Bhopal Crime) ही कहाणी आहे. मुलीच्या नात्यालाच नव्हे तर माणुसकीच्या नात्याला या महिलेनं काळीमा फासला. क्रूरतेच्या सर्व सीमा या मुलीनं (Bhopal News) ओलांडल्या.
मालमत्तेसाठी म्हाताऱ्या आई-बापाला आणि भावाला तिनं [blurb content=””]एका खोलीत अक्षरश: कोंडून ठेवलं होतं. या तिघांना ती जबर मारहाण करत असे आणि त्यांना उपाशीही ठेवत होती. या म्हाताऱ्या दाम्पत्याच्या परिचितानं या बाबतची तक्रार पोलिसांकडे केली. त्यानंतर पोलिसांनी या तिघांची सुटका केली आहे. पोलीस ज्या वेळी घरी पोहचले तेव्हा एका कुलूप लावलेल्या खोलीत हे म्हातारे आई-बाप कोंडून ठेवलल्या अवस्थेत होते.
बँकेत चीफ इंजिनिअर असलेल्या बापावर अत्याचार
या म्हाताऱ्या आई-बापांची आर्थिक स्थिती चांगली असल्याचं सांगण्यात येतंय. 80 वर्ष वयाचे सी. एस. सक्सेना हे स्टेट बँकेतून चीफ इंजिनिअर या पदावरुन निवृत्त झाले होते. ते त्यांची 76 वर्षांची पत्नी कनक सक्सेना आणि 48 वर्षांचा मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेला मुलगा विक्की यांच्यासह अरेरा कॉलनीत राहतात. त्यांना निधी नावाची मुलगी आहे, तिचं वय 45 वर्ष आहे, या निधीनंच आपल्या सख्खया आई-बापांवर असे अत्याचार केल्याचं समोर आलंय.
घटस्फोटित मुलीनं केले अत्याचार
निधिचं लग्न 2002 साली लखनौत करण्यात आलं होतं. 2016 साली पतीशी वाद झाल्यानं निधी परत भोपाळला आई बापांकडे आली होती. तिनं पतीपासून घटस्फोट घेतला होता. तिला दोन मुलं आहेत. मोठा मुलगा मैथिल हा 21 वर्षांचा तर लहान मुलगा 12 वर्षांचा आहे. गेल्या 7 वर्षांपासबन निधी माहेरीच राहत होती. या निधीला हे घर तिच्या नावावर करुन हवं होतं. तसचं ती वडिलांकडे 3 कोटी रुपयांची मागणी करीत होती.
ज्यांनी तक्रार दिली त्यांच्यासोबतही गैरव्यवहार
वृद्ध सी एस सक्सेना यांच्या ओळखीची व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी येत असे, तसचं त्यांच्याशी फोनवरही बोलणं करीत असे. जानेवारीत जेव्हा ही व्यक्ती सक्सेना यांना भेटण्यासाठी आली होती, त्यावेळी निधीनं त्यांना भेट नाकारली होती. त्यानंतर त्यांचं फोनवरही बोलणं झालं नव्हतं. 19 जूनला त्यांनी पत्नीसह पुन्हा सक्सेना यांना भेटण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीनं त्यांचा अपमान करुन त्यांना घराबाहेर काढलं होतं. त्यानंतर या परिचित व्यक्तीनं सक्सेना यांच्या घरातील प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली.
पोलिसांना घरात घुसण्यापासूनही रोखलं
तक्रारीनंतर जेव्हा पोलीस सक्सेना यांच्या घरी पोहले तेव्हा या निधीनं पोलिसांनी घरात येऊ नये यासाठी बरेच प्रयत्न केले. अखेरीस बळजबरीनं पोलिसांनी घरात प्रवेश केला आणि कुलुप तोडून आई-बापांची सुटका केली. मानसिक व्यंग असलेल्या विकीसह तिघांनाही पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय. आता या आई-वडिलांनी मुलीविरोधात तक्रार दाखल केलीय.
अनेक कागदपत्रांवर घेतल्या सह्या, पेन्शनही मुलगीच घेत होती
या वृद्ध दाम्पत्यानं सुटका झाल्यावर त्यांची कैफियत पोलिसांना सांगितली आहे. सख्खी मुलगी त्यांना मारहाण करत होती, हे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. नीट जेवायलाही देत नव्हती. एका खोलीत बंद करुन ठेवलं होतं, असंही त्यांनी सांगितलं. बँकेच्या अकाऊंटसह सगळी कागदपत्रं या मुलीनं तिच्याकडं ठेवली असल्याचही आई-बापांनी सांगितलंय. अनेक कागदपत्रांवर जबरदस्तीनं तिनं सह्या घेतल्या होत्या. घर विकून 3 कोटी रुपये द्या असा दबाव ही बाई आपल्या आई बापांवर टाकत होती.
सुरुवातीला सगळं व्यवस्थित होतं. मात्र अल्ताफ अन्सारी नावाचा तरुण हा आपल्या मुलीला भडकवत होता, असं या आई वडिलांनी सांगितलंय. अन्सारीच्या सांगण्यावरुनच मुलीनं आणि नातवंडांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोपही त्यांनी केलाय. हा अल्ताफ अन्सारी एक एनजीओ चालवतो, त्याचं कुटुंब आहे, मात्र त्यानं असा सल्ला कसा दिला, याचा शोध आता पोलीस घेतायते.