Photo Credit- Team Navrashtra
नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने मंगळवारी रात्री पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके)मधील दहशतवादी तळांवर निर्णायक कारवाई केली. लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या संयुक्त मोहिमेत एकूण ९ ठिकाणांवर हवाई हल्ले करण्यात आले, ज्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. ही कारवाई “ऑपरेशन सिंदूर” या कोडनेमने पार पडली. या नावाची शिफारस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः केली होती. त्यांनी संपूर्ण ऑपरेशनवर बारकाईने लक्ष ठेवले आणि सुरक्षा यंत्रणांशी सातत्याने संपर्कात होते.
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नवविवाहित जोडप्यांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलली असून पाकिस्तानमधील ९ ठिकाणी लक्ष्य करून हवाई हल्ले केले आहेत. या सैनिकी कारवाईला “ऑपरेशन सिंदूर” असे नाव देण्यात आले असून, त्यामागील संवेदनशील कारणामुळे या नावाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.संरक्षण तज्ज्ञांच्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्यात नवविवाहित जोडप्यांना लक्ष्य करण्यात आले. अनेकांनी हनिमूनसाठी हा निसर्गरम्य परिसर निवडला होता, मात्र दहशतवाद्यांच्या क्रूर कारवायांनी त्यांच्या स्वप्नांना हादरा दिला.
“Operation Sindoor ” नंतर पाकिस्तानची बौखललेली प्रतिक्रिया; LoCवर फायरिंग, 3 भारतीयांचा मृत्यू
या हल्ल्यात गुरुग्रामच्या हिमांशी नरवाल हिचा पती लेफ्टनंट विनय नरवाल शहीद झाला. त्यांच्या विवाहाला अवघे काहीच दिवस झाले होते. हिमांशीने आपल्या पतीसोबत हनिमूनसाठी पहलगामला जाण्याचा निर्णय घेतला होता. जयपूरच्या प्रियंका शर्मा हिचा पती रोहित शर्मा हल्ल्यात ठार झाला. प्रियांकाही गंभीर जखमी झाली असून सध्या तिच्यावर श्रीनगरमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिमल्यातील अंजली ठाकूर आणि तिचा पती विवेक ठाकूर पहलगाममध्ये ट्रेकिंगसाठी गेले असताना त्यांच्यावर हल्ला झाला. विवेक या हल्ल्यात ठार झाला, तर अंजली थोडक्यात बचावली. “आमचं आयुष्य सुरू होण्याआधीच संपलं,” असा तिचा भावनिक उद्गार अनेकांच्या काळजाला चटका लावून गेला.
पुण्याच्या स्नेहा पाटील हिचाही पती अमित पाटील या हल्ल्यात मृत्युमुखी पडला. स्नेहा रुग्णालयात असताना म्हणाली, “दहशतवाद्यांनी आमचं सर्वस्व हिरावून घेतलं.” या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर भारताने घेतलेल्या कारवाईला “ऑपरेशन सिंदूर” हे नाव देण्यात आले असून, नवविवाहित स्त्रियांच्या कपाळाचे सिंदूर पुसणाऱ्या दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी हे नाव अत्यंत प्रतीकात्मक असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे मत आहे.
Operation Sindoor: भारताचा पराक्रम! पाकिस्तानात 100 KM
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्यात २६ निष्पाप नागरिकांचे प्राण गेले, त्यात अनेक नवविवाहित पर्यटकांचा समावेश होता. हल्लेखोरांनी लोकांची नावे आणि धर्म विचारून पुरुषांना लक्ष्य केल्याचे उघड झाले. परिणामी, या अमानवी कृत्याने देशाला हादरवून टाकले.