Photo Credit- X @Congress अदानी मुद्द्यावरून राहुल गांधींसह संसदेत विरोधक आक्रमक
नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांपासून देशभरात उद्योगपती गौतम अदानी यांच्यां मुद्द्यावरून विरोधी पक्षाकडून सातत्याने आवाज उठवला जात आहे. गौतम अदानी यांच्या घोटाळे उघड व्हावेत, त्यांच्यी चौकशी व्हावी, अशी मागणी राहूल गांधींकडून केली जात आहे. याच मुद्द्यावरून आज पुन्हा संसदेत गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी संविधानाची प्रत घेऊन संसदेच्या आवारात निदर्शने केली. या आंदोलनात राहुल गांधींसोबत प्रियांका गांधी वाड्राही सहभागी झाल्या होत्या. विरोधी पक्षाच्या खासदारांनी तोंडाला काळे मास्क लावून निषेध केला. काल संसदेतही या मुद्द्यावरून गदारोळ झाला होता. विरोधी पक्षाच्या खासदारांनी काळे जॅकेट घालून संसदेच्या आवारात निदर्शने केली. त्यानतर त्यानंतर लोकसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
दुसरीकडे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी संसदेबाहेरही या मुद्द्यावरून विरोधी पक्षाच्या खासदारांनी संविधानाची लाल प्रत हातात घेऊन संसदेच्या आवारात निदर्शने केली. प्रियांका गांधी यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धारेवर धरले. त्या म्हणाल्या की, अदानी मेगा घोटाळ्याची संसदेत चर्चा व्हावी, अशी देशातील जनतेची इच्छा आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार या मुद्द्यांपासून पळ काढत आहेत. संसदेच्या विरोधी आघाडीच्या नेत्यांनी मोदी आणि अदानी एक आहेत म्हणून अदानी सुरक्षित आहेत. अशा आशयाचे स्टिकर असलेले काळे जॅकेट घातल होते. याचवेळी संसदेत अदानी प्रकरणाची संयुक्त संसदीय चौकशीची मागणी करत घोषणाबाजी करण्यात आली. प्रियांका गांधी यांनी या निदर्शनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
Kalidas kolambar News: कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्षपदी निवड होणार..
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्स वर एक व्हिडिओ पोस्ट करत प्रियांका गांधी म्हणाल्या, “देशातील जनतेला आदानी मेगा घोटाळ्यावर संसदेत चर्चा व्हावी अशी इच्छा आहे. भारत आघाडीचे सर्व पक्ष संसदेत चर्चेची मागणी करत आहेत पण नरेंद्र मोदीजी आणि सरकार सतत चर्चेपासून पळत आहे, ज्या पद्धतीने पंतप्रधान अदानींच्या भ्रष्टाचाराचा बचाव करत आहेत, ते धक्कादायक असल्याचेही त्यांनी यावेळी नमुद केलं.
राहुल गांधी यांनीही त्यांच्या पांढऱ्या टी-शर्टवर स्टिकर लावले होते. पंतप्रधान अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्याविरोधात चौकशी करू शकत नाहीत, कारण ते स्वत:विरोधात चौकशी करण्यासारखे असेल, असा दावा त्यांनी केला. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) मार्फत चौकशीची मागणी करत आहेत. अदानी यांना तत्काळ अटक करण्याची मागणीही राहुल गांधी यांनी केली. पण अदानी यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.
Repo Rate : RBI कडून रेपोदराबाबत निर्णय जाहीर, तुमच्या EMI वर काय होईल परिणाम?