नवी दिल्ली: ओडिशातील बालासोर रेल्वे अपघातात (odisha) 293 जणांचा मृत्यू तर 1000 प्रवासी जखमी झाले होते. या भीषण अपघातापासून धडा घेत आता भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. बालासोर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांपैकी ७० टक्के प्रवाशांनी रेल्वेने देऊ केलेला विमा निवडला (insurance)नव्हता आणि ते या विशेष सुविधेपासून वंचित राहिले. नव्या प्रणालीनुसार आता प्रवाशांना तिकीट बुक करताच विम्याचे संरक्षण मिळणार आहे. या बदल्यात खूप कमी खर्च प्रवाशांना करावा लागणार आहे.
[read_also content=”आश्चर्यच! रस्त्यावरून चालताना महिलेचं अचानक मूर्तीत रुपातरं; व्हिडिओ जगभरात व्हायरल, टाईम ट्रॅव्हलशी होतेय तुलना https://www.navarashtra.com/viral/suddenly-women-freeze-while-walking-on-road-in-video-goes-viral-on-social-media-nrps-433072.html”]
ज्या प्रकारे आपण इतर विमा योजनाचा लाभ घेतो त्याप्रमाणे रेल्वेने आयआरसीटीसीकडून तिकीट बुक करताना दिलेली विम्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. म्हणजे प्रवाशांना या सुविधेसाठी वेगळा पर्याय निवडावा लागणार नाही, उलट तिकीट बुकिंगच्या वेळी हा पर्याय आपोआप निवडला जाईल.
या सुविधेअंतर्गत रेल्वे अपघात झाल्यास 10 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण देते. त्याची किंमतही केवळ 35 पैसे आहे. आतापर्यंत वैयक्तिक अपघात विमा संरक्षणाची ही सुविधा ऐच्छिक होती आणि तिची निवड प्रवाशांच्या इच्छेवर अवलंबून होती.
प्रवाशांमध्ये अनभिज्ञता
अनेक प्रवाशांना या सुविधेबद्दल माहिती नसल्याची माहिती समोर आली आहे. तर, अनेक प्रवाशांनी या सुविधेची निवड केली नसल्याचे रेल्वेच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता ही सुविधा आता स्वयंचलित करण्यात आल्याचे रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. आता तिकीट बुकिंगच्या वेळी ते विम्याचा पर्याय निवडण्याची गरज नाही. प्रवाशांना तिकिटासह ही सुविधा आपोआप मिळेल. वास्तविक, बालासोर दुर्घटनेत बळी पडलेल्या बहुतेक प्रवाशांनी या सुविधेचा पर्याय निवडला नव्हता आणि ते मोठे कव्हर मिळविण्यापासून वंचित राहिले. त्यामुळे ही बाब लक्षात घेता आता रेल्वेने ही सुविधा स्वयंचलित केली आहे.