अहमदाबादच्या विमान दुर्घटनेवर मोदींचे ट्वीट (फोटो- टीम नवराष्ट्र )
अहमदाबाद: अहमदाबादमध्ये एअर इंडियाचे लंडनला जाणारे प्रवासी विमान कोसळले आहे. यामध्ये 242 प्रवासी आणि 10 क्रू मेंबर्स प्रवास करत असल्याचे समजते आहे. हे प्रवासी विमान रहिवाशी भागात कोसळले आहे. अहमदाबादच्या बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलर हे विमान कोसळले आहे. यामध्ये 15 डॉक्टर देखील जखमी झाले आहेत. दरम्यान या घटनेची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून, त्यांनी ट्वीट करत या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?
अहमदाबादमध्ये झालेल्या घटनेने आपल्या सर्वांना धक्का बसला आहे. ही घटना इतकी हृदयद्रावक आहे की जी शब्दांत सांगता येत आहे. या कठीण प्रसंगी यामध्ये प्रभावित झालेल्या सर्वांप्रती माझ्या संवेदना आहेत. या घटनेत प्रभावित झालेल्या बंधितांना मदत करणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या मी संपर्कात आहे.
The tragedy in Ahmedabad has stunned and saddened us. It is heartbreaking beyond words. In this sad hour, my thoughts are with everyone affected by it. Have been in touch with Ministers and authorities who are working to assist those affected.
— Narendra Modi (@narendramodi) June 12, 2025
अहमदाबाद-लंडन विमान कोसळले
अहमदाबादवरून लंडनला जाणारे विमान अहमदाबामध्ये कोसळले आहे. एअर इंडियाचे एआय १७१ हे विमान कोसळले आहे. विमान कोसळल्याने आजूबाजूच्या परिसरात मोठे नुकसान झाले आहे. उड्डाण करताना हे विमान कोसळले आहे. लंडनला जाणाऱ्या या विमानाने नुकतेच उड्डाण केल्याने त्यामध्ये इंधन देखील मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अपघाताची तीव्रता वाढताना दिसून येत आहे. अपघातग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Ahmedabad plane crash: अहमदाबाद-लंडन विमान कोसळले; प्रवाशांमध्ये माजी CM विजय रूपानी असण्याची शक्यता
या विमान दुर्घटनेत मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असल्याची शक्यता आहे. रहिवाशी इमारती देखील या घटनेत कोसळल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे जीवितहानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. एअर इंडियाचे ड्रीमलायनर हे बोईंग विमान अहमदाबादच्या मेघानीनगर या परिसरात कोसळले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेची माहिती घेतली आहे. अग्निशमन दलाच्या अनेक गाडया आग घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
प्रवाशांच्या सेफ्टीसाठी कोणती खबदारदारी घ्यावी?
विमानाची स्थिती:प्रत्येक उड्डाणापूर्वी विमानामधील यंत्रणेची, ज्यामध्ये इंजिन, हायड्रॉलिक्स आणि एव्हियोनिक्स यांचा समावेश आहे. याची सखोल तपासणी केली गेली पाहिजे.
फ्लाइट क्रू: पायलट आणि फ्लाइट क्रू मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त आहेत का याची खात्री केली पाहिजे.
Ahmedabad Plane Crash: Airlines ने प्रवाशांच्या सेफ्टीसाठी कोणती खबदारदारी घ्यावी?
सतत प्रशिक्षण: वैमानिक व केबिन क्रू यांना त्यांच्या भूमिकांमध्ये कुशलता यावी म्हणून विमान कंपन्यांनी नियमित व सखोल प्रशिक्षण द्यावेत.
इमर्जन्सी सिच्युएशन मॅनेजमेंट: आग, टर्ब्युलन्स किंवा मेडिकल इमर्जन्सी सारख्या प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी क्रूला विशेष प्रशिक्षण दिले जावे.
महत्वाची नियमावली (SOP): उड्डाणाशी संबंधित प्रत्येक प्रक्रियेसाठी ठराविक नियमावली असते, ज्याचे पालन करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जावे.