राजकारण तापणार! राहुल गांधींच्या त्या विधानानंतर काँग्रेस मुख्यालयावर हल्ला
West Begal News: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र यांच्याबाबत अपमानजनक विधान केल्याप्रकऱणी राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नरेंद्र मोदी यांच्या बाबत अपमानजनक विधान केल्याप्रकऱणी बिहारनंतर आता कोलकाता येथील प्रदेश काँग्रेस समितीच्या मुख्यालयावरदेखील हल्ला कऱण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केल्याची माहिती आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या ‘अपमानजनक’ टिप्पणीच्या निषेधार्थ हा हल्ला करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की अटक करण्यात आलेल्यांमध्ये मुख्य आरोपी संतोष राजवा आणि त्याचे दोन साथीदार आहेत. त्यांच्यावर राहुल गांधींचे फोटो काळे फासणे , पक्षाचे फलक फाडण्याचे आणि परिसरात उपस्थित असलेल्या लोकांना धमकावण्याचा आरोप आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तिघेही आरोपी त्यांच्या समर्थकांसह सीआयटी रोडवरील कार्यालयाबाहेर टायर जाळण्यात आणि जबरदस्तीने आत जाण्याचा प्रयत्न करण्यातही सहभागी होते.
दिल्ली मेट्रोत पुन्हा दे दणादण! दोन महिलांमध्ये सीटवरुन जबर हाणामारी, Video Viral
हल्ल्यातील मुख्य आरोपी स्थानिक भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नेते राकेश सिंह हा फरार आहे. पोलिस आता राकेश सिंह आणि काँग्रेसच्या तक्रारीत नाव असलेल्या इतर आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि उर्वरित आरोपींना लवकरच अटक केली जाईल. हा हल्ला नुकताच काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झालेल्या राकेश सिंह यांनी केल्याचा आरोप आहे. बिहारमध्ये राहुल गांधींच्या ‘मतदार हक्क यात्रे’ दरम्यान पंतप्रधानांविरुद्ध केलेल्या टिप्पणीचा निषेध करत असल्याचे निदर्शकांनी सांगितले.
पोलिसांच्या पथकांकडून हल्ल्यातील, मुख्य आरोपी, राकेश सिंग आणि काँग्रेसच्या तक्रारीत नाव असलेल्या इतरांचा शोध सुरू आहे. आम्ही आमचा तपास सुरू केला आहे. राकेश सिंग आणि इतरांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत,” असे अधिकाऱ्याने सांगितले. काँग्रेसचे बंडखोर नेते सिंह यांच्या नेतृत्वाखाली निदर्शकांनी बिहारमध्ये राहुल गांधींच्या ‘मतदार अधिकार यात्रे’ दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल केलेल्या अपमानास्पद टिप्पण्यांचा निषेध करण्यासाठी हा हल्ला केल्याचे वृत्त आहे.
Ambadas Danve Tenure End: महाराष्ट्रात महायुतीची एकहाती सत्ता! विरोधी पक्षनेताच उरला नाही
दुसरीकडे भाजपकडून झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस समर्थकांनी मोहम्मद अली पार्कजवळील मुरलीधर सेन लेन येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयाजवळ निदर्शने केली. त्याचे नेतृत्व प्रदेश काँग्रेस अध्यक्ष शुभंकर सरकार यांनी केले. भाजप समर्थक कार्यालयासमोर मोठ्या संख्येने जमले तेव्हा पोलिसांनी दोन्ही गटांमधील संघर्ष टाळण्यासाठी बॅरिकेड्स लावले. वेगळ्या निषेधात, काँग्रेस समर्थकांनी दुपारी अर्धा तास हाजरा क्रॉसिंग रोखले.
फेसबुक व्हिडिओ पोस्टमध्ये राकेश सिंह यांनी पंतप्रधान मोदींविरुद्ध केलेल्या आक्षेपार्ह टिप्पण्यांच्या निषेधार्थ त्यांच्या कृतींचे समर्थन केले. “मी राहुल गांधींचा फोटो सर्वांसमोर काळा केला आणि हे कृत्य लाईव्ह-स्ट्रीम केले. मला याची भीती किंवा लाज नाही. ममता बॅनर्जींचे पोलिस माझे काहीही करू शकत नाहीत.” अशा आशयाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांनी या हल्ल्याचे समर्थन केले आहे. “भाजप समर्थकांच्या टिप्पण्यांबद्दलच्या भावना आणि राग योग्य आहेत, परंतु पक्ष दुसऱ्या पक्षाच्या कार्यालयावर हल्ला करण्यासारख्या कोणत्याही कृतीला मान्यता देत नाही मला वाटते की आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य आणि केंद्रीय मंत्री सुकांता मजुमदार यांनी आधीच त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.