कष्टकरी वर्गासोबत राहुल गांधींची दिवाळी साजरी (फोटो - सोशल मीडिया)
नवी दिल्ली : देशभरामध्ये दीपावली सणाचा उत्साह आहे. सर्वत्र दिव्यांच्या प्रकाशात आणि झगमगटामध्ये दिवाळी साजरी केली जात आहे. मात्र अशीही काही घरं आहेत ज्यांच्या घरी हा प्रकाश हा आनंद दिसत नाही. लोकसभेचे विरोधी पक्षनेते व कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी अशा कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली आहे. कष्टकरी लोकांचे काम आणि आयुष्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच त्यांच्यासोबत मातीच्या पणत्या देखील तयार केल्या आहेत.
राहुल गांधी यांनी त्यांच्या ऑफिशियल अकाऊंटवरुन व्हिडिओ शेअर केली आहेत. यामध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे अनोख्या प्रकारची दिवाळी साजरी करताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांना नेत्यांचा हा अंदाज आवडला असून तुफान कमेंट्स केल्या जात आहेत. राहुल गांधी आणि त्यांचा भाचा रेहान वढेरा दिसून येत आहे. दोघांनी कष्टकरी माणसांसोबत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये राहुल गांधी हे अगदी भिंत खरवडत आहेत. तसेच कामगारांच्या सोबक रंग मारण्याचे काम देखील करत आहेत. भिंत खरवडताना किंवा भेगांमध्ये लांबी भरताना काय समस्या येतात, याबद्दल कामगारांशी गप्पा मारल्या. तसेच राहुल गांधींच्या डोळ्यामध्ये धुळ गेल्याचे देखील दिसत आहे. राहुल गांधींनी कामगारांना तुम्हाला या सगळ्या कामाचा काय त्रास होतो, असे विचारत समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
हे देखील वाचा : भाजपला मोठा धक्का, ‘या’ दिग्गज नेत्याचा आम आदमी पक्षात प्रवेश
एक दिवाली उनके साथ, जिनकी मेहनत से रौशन है भारत! pic.twitter.com/bfmmrjZD2S
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 1, 2024
त्याचबरोबर राहुल गांधी यांनी दिल्लीतील उत्तम नगरमध्ये मातीच्या पणत्या आणि नक्षीकाम केलेली भांडी तयार करणाऱ्या एका कारखान्याला भेट दिली. या ठिकाणीही राहुल गांधी यांनी स्वतः मातीच्या पणत्या बनवल्या. पारंपरिक पद्धतीने मातीची भांडी आणि पणत्या तयार कशा केल्या जातात, याची माहिती राहुल गांधींनी घेतली. सध्या राहुल गांधी हे अनेकदा कष्टकरी वर्गाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधताना दिसतात. आता पुन्हा एकदा प्रत्यक्षामध्ये कामगारांपर्यंत जात त्यांची दिवाळी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
हे देखील वाचा : ऐन दिवाळीत फुटला महागाईचा बॉम्ब, गॅस सिलेंडरच्या दरात 62 रुपयांची वाढ
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी कष्टकरी वर्गासोबत दिवाळी साजरी केली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांना दिवाळी देखील घरी जाता येत नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी गुरुवारी कच्छमध्ये भारतीय लष्करातील जवानांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी मोदींनी लष्करी गणवेश परिधान केला होता. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी लष्करी जवानांना मिठाई भरवून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.