जयपूर : तिकीट वाटपावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Ashok Gehlot) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदावर आपला दावा करत विरोधकांना ठणकावले. मला मुख्यमंत्रिपद सोडायचे आहे, पण ते पद मला सोडत नाही आणि भविष्यातही सोडणार नाही, असे ते म्हणाले. तिकीट वाटप आणि विद्यमान आमदारांचे तिकीट कापण्याच्या प्रश्नावर बोलताना आमदारांविरोधात असंतोष नसल्याचे ते म्हणाले.
आमदारांचा बचाव करणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. 18 ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर तिकिटांची पहिली यादी जाहीर केली जाईल, असा निर्णय पक्षाने आठवडाभर आधीच घेतला होता. मात्र केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत स्क्रीनिंग समितीने पाठवलेल्या सुमारे 100 जागांसाठी एकाच नावावर एकमत होऊ शकले नाही. केंद्रीय निवडणूक समितीने सुमारे डझनभर जागांवर आक्षेप व्यक्त यासोबतच गहलोत आपल्या समर्थक केला आहे.
सोनिया गांधींनी मला मुख्यमंत्री केले. काँग्रेसमध्ये जो मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार होतो तो कधीच मुख्यमंत्री होत नाही. सोनिया गांधींनी माझी मुख्यमंत्रिपदासाठी निवड केली होती. त्यानंतर पुढच्या निवडणुकीत सोनिया गांधींनी जोरदार प्रचार केला, पण आपण निवडणूक हरलो, यामागे अनेक कारणे होती.
– अशोक गहलोत, मुख्यमंत्री, राजस्थान.