संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

उत्तर प्रदेशातील इटावामध्ये मोठी दुर्घटना टळली. शिवगंगा एक्सप्रेस (Shiv Ganga Express) लाल सिग्नल ओलांडून एक किलोमीटर पुढे गेली. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यावेळी रेल्वेने ओएचईची वीज खंडित करुन कशीतरी रेल्वे थांबवली. यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

    इटावा : उत्तर प्रदेशातील इटावामध्ये मोठी दुर्घटना टळली. शिवगंगा एक्सप्रेस (Shiv Ganga Express) लाल सिग्नल ओलांडून एक किलोमीटर पुढे गेली. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यावेळी रेल्वेने ओएचईची वीज खंडित करुन कशीतरी रेल्वे थांबवली. यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला. उत्तर मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी अमित सिंग यांनी याप्रकरणी तपास सुरु असून, निष्काळजीपणा आढळल्यास दोन्ही लोको पायलटवर कारवाई केली जाईल, असे सांगितले.

    मिळालेल्या माहितीनुसार, शिवगंगा एक्सप्रेसनं दिल्ली-हावडा रेल्वे मार्गावरील इटावामधील भरथना स्थानकाच्या पाच किलोमीटर आधी लाल सिग्नल (ओव्हरशूट) च्या आधी थांबायचे होते. हा सिग्नल लाल होता. पण रेल्वे त्याच्या एक किमी पुढं गेली. याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाला मिळताच तात्काळ ओएचई वीज खंडित करुन रेल्वे थांबवण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कानपूर ते दिल्लीपर्यंत स्वयंचलित सिग्नल यंत्रणा आहे. ही यंत्रणा दोषविरहीत आहे. त्यामुळे सिग्नलमध्ये कोणतंही बिघाड होऊ शकत नाही.

    चार लोको पायलटची होणार चौकशी

    याप्रकरणी रेल्वेने चौकशी सुरू केली असून, दोन्ही गाड्यांच्या चालकांची चौकशी करण्यात येत असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. शिवगंगा एक्सप्रेसला (12599) भरथना स्थानकापूर्वी सिग्नल क्रमांक 507 ओलांडला. यावेळी रेल्वेचा वेग ताशी 80 किमी होता. ही रेल्वे सिग्नलच्या जवळपास एक किलोमीटर पुढे गेली. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.