PM मोदींची इंडोनेशियातील हजारो वर्षे जुन्या हिंदी मंदिराला भेट; प्रम्बाननचा खास VIDEO पंतप्रधानांनी केला शेअर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
FBI ची मोठी कारवाई! लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांना अटक; अमेरिका, कॅनडा आणि युरोपमध्ये छापेमारी
प्रम्बानन हे इंडोनेशियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर असून भारत आणि इंडोनेशियातील हजारो वर्षांच्या सांस्कृतिक संबंधांचे प्रतीक मानले जाते. मंदिराच्या भेटीदरम्यान पंतप्रधानांनी जीर्ण झालेल्या मंदिराच्या संवर्धन आणि पुनर्बांधणीसाठी सहकार्य वाढवण्यावर निर्णय घेतला. भारतीय पुरातत्वीय सर्वेक्षण(ASI) आणि इंडोनेशियातील तज्ज्ञांची टीम संयुक्तपणे काम करेल याची माहिती पंतप्रधानांनी दिली.
प्रम्बानन मंदिर इ. स. ८५० च्या काळात संजय राजवंशातील राजा राकाई पिकातन यांनी उभारले होते. या मंदिर समूहात सुरुवातील २४० लहान-मोठी मंदिरे होती. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींना हे मंदिर समर्पित आहे. यातील भगवान शंकराचे मंदिर हे ४७ मीटर उंच असून पर्यटकांसाठी विशेष आकर्षण मानले जाते.
मुख्य मंदिरात भगवान शिव, माता पावर्ती, भगवान गणेश आणि महर्षी अगस्त्य यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या दडगी भिंतीवर रामायण आणि भागवत पुराणाती प्रसंगाचे सुंदर असे शिल्पांकन केले आहे. मंदिराच्या खुल्या परिसरात रंगमंचावर प्रसिद्ध प्रम्बानन रामायण बॅले या संस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरणे केले जाते. दरवर्षी हा कार्यक्रम पाहण्यासाठी हजारो पर्यटक आणि भाविक या मंदिराला भेट देतात.
प्रम्बानन मंदिराला युनेस्कोने १९९१ मध्ये जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केले आहे. एका मुस्लिमबहुल देशात इंडोनेशियाने हिंदू प्राचीन सांस्कृतिचे जतन केले आहे. यामुळे या मंदिराला जागतिक स्तरावर विशेष स्थान दिले जाते.
इंडोनेशियाची लोकसंख्या सुमारे २७ कोटी आहे. त्यातील ८७ टक्के नागरिक मुस्लिम धर्मीय आहेत, तर हिंदूंची लोकसंख्या सुमारे १,७ % म्हणजे ४५ लाख आहे. तर इंडोनेशियातील प्रसिद्ध पर्टनस्थळ बाली येथे सर्वाधिक हिंदू समुदाय आहे. पंतप्रधानांच्या या भेटीमुळे दोन्ही देशांतील सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि वारसा संवर्धन सहाकार्याला बळ मिळेल अशा अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
The majestic Prambanan Temple! pic.twitter.com/pRS2S9X5gm — Narendra Modi (@narendramodi) July 8, 2026






