३२ लाख मुस्लिमांना 'सौगात-ए-मोदी' (फोटो- ट्विटर)
नवी दिल्ली : मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण काही दिवसांवर आला आहे. ईदच्या निमित्ताने भाजप मुस्लीम समाजाला विशेष गिफ्ट देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप अल्पसंख्याक मोर्चा देशातील 32 लाख गरीब मुस्लिमांना ईदसाठी ‘सौगात-ए-मोदी’ किट देणार आहे. ईद साजरी करण्यासाठी बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. रमजानच्या पवित्र महिन्यात गरीब, गरजू शेजारी यांना मदत करण्यावर भाजपने आता जोर दिला आहे.
पश्चिम बंगाल आणि बिहार निवडणुकीपूर्वी भाजपने देशभरातील मुस्लिमांमध्ये पोहोच आणि स्वीकृती वाढवण्यासाठी एक मोठे पाऊल उचलले आहे. ईदच्या निमित्ताने भाजप मुस्लीम समाजाला विशेष गिफ्ट देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप अल्पसंख्यांक मोर्चा देशातील 32 लाख गरीब मुस्लिमांना ईदसाठी ‘सौगात-ए-मोदी’ किट देणार आहे. जेणेकरून ईद साजरी करण्यासाठी त्यांना कुठलीही अडचण होऊ नये. ईदसाठी हे गिफ्ट गरजू मुस्लिमांसाठी वाटप केले जाईल.
अल्पसंख्याक मोर्चाचे 32 हजार पदाधिकारी देशातील 3 हजार मशिदींमध्ये जातील. त्याठिकाणी 32 लाख गरजू मुस्लीम व्यक्तींना मदत केली जाणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी दिल्लीच्या निजामुद्दीन इथून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. गरीब मुस्लीम कुटुंबाला ईद साजरी करण्यासाठी बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते.
इफ्तार पार्टीतही सामील होणार?
ईदच्या काळात भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात मुस्लिमांपर्यंत पोहोचत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी इफ्तार पार्टीत सामील होऊन सर्वांना आश्चर्यचकित करू शकतात, असे म्हटले जात आहे.
किटमध्ये कोणते सामान
भाजपाच्या मोदी किटमध्ये ईदशी संबंधित वस्तू असतील. ज्यामध्ये शेवया, खजूर, सुकामेवा, बेसन, तूप-डालडा आणि महिलांसाठी सूट फॅब्रिकचा समावेश असेल. याशिवाय, किटमध्ये इतर काही आवश्यक वस्तू देखील असू शकतात. जे ईदच्या वेळी उपयुक्त ठरू शकते.