'केवळ चिप प्रसिद्धीसाठी', प्रोटोकॉलवर दाखल याचिकेवर CJI भडकले, वकिलाला ठोठावला ७००० रुपयांचा दंड
नवी दिल्ली : “परीक्षेच्या अखंडतेशी तडजोड झाली असेल तर फेरपरीक्षेबाबत निर्णय द्यावा लागेल. पण पेपर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून फुटला तर तो वणव्यासारखा पसरू शकतो.” अशी प्रतिक्रीया नीट (NEET) संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर आज सुनावणी दरम्यान न्यायालयाने दिली. सध्या या प्रकरणाची पुढील सुनावणी बुधवारी 11 जुलै रोजी होणार आहे.
सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठासमोर नीट संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर आज सुनावणी पार पडली. यावेळी त्यांनी पेपरफुटी आणि परीक्षांची पारदर्शकता आणि गोपनीयतेवर आपली भूमिका स्पष्ट केली.
NEET UG च्या मुद्द्यावर, सरन्यायाधीश म्हणाले की, जर वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG 2024 ची अखंडता ‘नष्ट’ झाली असेल आणि त्याची फुटलेली प्रश्नपत्रिका सोशल मीडियावरून प्रसारित केली गेली असेल, तर ही परीक्षा पुन्हा घेण्याचे आदेश द्यावे लागतील. तसेच, जर प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार टेलिग्राम, व्हॉट्सॲप आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातून होत असतील तर ते “वणव्याप्रमाणे पसरण्यास वेळ लागणार नाही.
“एक गोष्ट स्पष्ट आहे की प्रश्नपत्रिका फुटली आहे. परीक्षेचे पावित्र्य नष्ट झाल्यास फेरपरीक्षेचे आदेश द्यावे लागतील. जर आम्ही दोषींना ओळखू शकलो नाही तर फेरपरीक्षेचे आदेश द्यावे लागतील. जे घडले ते आपण नाकारू शकत नाही. पण जर सरकार परीक्षा रद्द करणार नाही, असे गृहीत धरल्यास प्रश्नपत्रिका फुटल्यानंतर ज्यांना त्याचा लाभ झाला, त्यांची ओळख पटवण्यासाठी सरकार काय करणार, असा सवालही न्यायालयाने उपस्थित केला.
“प्रश्नपत्रिका फुटली आहे यात शंका नाही. त्याचा तपासही सुरू आहे. पण त्यातही काही महत्त्वाचे संकेत आहेत. ते म्हणजे, 67 उमेदवारांनी 720 पैकी 720 गुण मिळवले मिळवलेत. पण गेल्या वर्षी याचे प्रमाण खूप कमी होते. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे किती लोकांना फायदा झाला आणि केंद्राने त्यांच्यावर काय कारवाई केली हे जाणून घ्यायचे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
दरम्यान, 5 मे रोजी झालेल्या परीक्षेत मोठ्या प्रमाणावर कथित अनियमितता झाल्याबद्दल एनटीए आणि केंद्रीय शिक्षण मंत्रालय विद्यार्थी आणि राजकीय पक्षांच्या केंद्रस्थानी आले आहेत. देशभरातील सरकारी आणि खाजगी संस्थांमधील MBBS, BDS, आयुष आणि इतर संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NTA द्वारे NEET-UG परीक्षा घेतली जाते. पण पेपर फुटीआणि अनियमिततेच्या आरोपांमुळे अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरू असून त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही चांगलाच संघर्ष सुरू आहे.