सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांचे निधन (Photo Credit - X)
सर्वात युवा राज्यपाल होण्याचा विक्रम
१९९० मध्ये, अवघ्या ३७ वर्षांच्या वयात त्यांची मिझोरामचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. त्यावेळी ते देशातील सर्वात युवा राज्यपाल ठरले. ते ९ फेब्रुवारी १९९३ पर्यंत या पदावर कार्यरत होते. विशेष म्हणजे, त्यांची पत्नी सुषमा स्वराज यांच्या नावावरही देशातील सर्वात युवा कॅबिनेट मंत्री बनण्याचा विक्रम आहे.
सांसद एवं प्रदेश मंत्री सुश्री बांसुरी स्वराज जी के पिताजी श्री स्वराज कौशल जी का आज 4 दिसम्बर, 2025 को निधन हो गया है। उनका अंतिम संस्कार आज 4 दिसम्बर, 2025 को सायं 4.30 बजे लोधी रोड श्मशान घाट पर किया जायेगा। — BJP Delhi (@BJP4Delhi) December 4, 2025
राजकीय आणि कायदेशीर कारकीर्द
स्वराज कौशल यांची राजकीय कारकीर्दही शानदार राहिली. १९९८ मध्ये हरियाणा विकास पक्षाचे उमेदवार म्हणून ते राज्यसभा खासदार म्हणून निवडून आले आणि १९९८ ते २००४ पर्यंत त्यांनी या पदावर काम केले. १९९८-९९ दरम्यान सुषमा स्वराज लोकसभेत आणि स्वराज कौशल राज्यसभेत होते. तर २००० ते २००४ या काळात दोघेही एकाच वेळी राज्यसभा सदस्य होते.
हे देखील वाचा: सुषमा स्वराज यांची ‘ती’ परंपरा लेकीने ठेवली कायम; सोशल मीडियावर रंगली चर्चा
मिझोरम शांतता करारात महत्त्वाची भूमिका
स्वराज कौशल हे उत्तर-पूर्व (ईशान्य) भागातील समस्यांचे मोठे जाणकार मानले जात होते. १९७९ मध्ये अंडरग्राउंड मिझो नेते लालडेंगा यांच्या सुटकेत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. नंतर ते मिझो नॅशनल फ्रंटचे संवैधानिक सल्लागार (Constitutional Advisor) बनले आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे मिझोरम शांतता करार (Mizoram Peace Accord) तयार झाला, ज्यामुळे २० वर्षांच्या बंडाळीचा अंत झाला. याच योगदानामुळे त्यांना मिझोरामचे राज्यपाल नियुक्त करण्यात आले. आणीबाणीच्या काळात (Emergency) जॉर्ज फर्नांडिस आणि इतर २४ लोकांवर बडोदा डायनामाइट केसमध्ये (Baroda Dynamite Case) खोटे आरोप लावण्यात आले तेव्हा त्यांची कोर्टात बाजू मांडण्याचे काम स्वराज कौशल यांनी केले होते.
कायदेशीर आणि कौटुंबिक जीवन
डिसेंबर १९८६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना सीनियर ॲडव्होकेट चा दर्जा दिला आणि एक वर्षानंतरच ते ॲडव्होकेट जनरल बनले. त्यांनी १३ जुलै १९७५ रोजी एबीव्हीपी कार्यकर्त्या आणि आरएसएस नेत्याची मुलगी असलेल्या सुषमा स्वराज यांच्याशी विवाह केला. त्यांची मुलगी बांसुरी स्वराज ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवीधर असून सध्या बॅरिस्टर म्हणून दिल्ली उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात कार्यरत आहेत. आपल्या प्रदीर्घ सार्वजनिक जीवनात सक्रिय असूनही स्वराज कौशल यांनी नेहमीच एक साधे आणि लो-प्रोफाइल जीवन जगले.
हे देखील वाचा: सुषमा स्वराज यांची लेक राजकाराणाच्या मैदानात; भाजपकडून लोकसभा उमेदवारी






