नवी दिल्ली : सध्या लोकसभेत पावसाळी अधिवेशन (Loksabha Monsoon session) सुरु आहे, पण या अधिवेशनात विरोधीपक्ष महागाईविरोधात (Opposition is against inflation) अधिक आक्रमक झाल्याचे पाहयाला मिळते. दरम्यान आज सभागृहा (Loksabha House) गोंधळ घालणाऱ्या काँग्रेसच्या चार खासदारांचे (of four congress mp) संपूर्ण अधिवेशन होईपर्यंत निलंबन करण्यात आले आहे. (suspension of four congress mp for the entire session was pointing out in the lok sabha) काँग्रेस खासदार मणिकम टागोर, ज्योतिमणी, रम्या हरिदास आणि टीएन प्रतापन (Manickam Tagore, Jyotimani, Ramya Haridas and TN Pratapan) यांना संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आले आहे. जीवनाश्यक वस्तूंच्या किमतीत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या खासदारांनी गोंधळ घालत निदर्शने केली, त्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
[read_also content=”विविध 9 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी, प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांची 13 ऑगस्टला प्रसिद्धी https://www.navarashtra.com/maharashtra/publication-of-ward-wise-draft-electoral-lists-for-general-elections-of-various-9-municipal-corporations-on-august-13-308011.html”]
दरम्यान, नियम ३७४ अन्वये काँग्रेसच्या चार खासदारांना अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. “हे लोकशाहीचे मंदिर आहे. सभागृहाची प्रतिष्ठा राखणे ही सदस्यांची जबाबदारी आहे. सरकार चर्चेसाठी तयार आहे. असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निदर्शन करणाऱ्या खासदारांना म्हटले. लोकसभेचे कामकाज मंगळवार २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले आहे. सभापतींच्या खुर्चीत बसलेल्या राजेंद्र अग्रवाल यांनी गोंधळ घालत असलेल्या काँग्रेसच्या चार खासदारांची नावे घेतली.