यंदा मान्सूनचा पाऊस जास्त होणार; देशातील ‘या’ राज्यांमध्ये हवामान विभागाने दिला मुसळधार पावसाचा इशारा

उत्तर-पश्चिम राज्यांसह देशाच्या अनेक भागांमध्ये एप्रिल महिन्यातच मे आणि जूनच्या तीव्र उष्णतेचा तडाखा जाणवत आहे. मात्र, हवामान खात्याने दिलासा दिला आहे. एल निनोचा प्रभाव कमी असल्याने यंदा मान्सूनचा पाऊस गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच जास्त होण्याची शक्यता आहे.

    नवी दिल्ली : उत्तर-पश्चिम राज्यांसह देशाच्या अनेक भागांमध्ये एप्रिल महिन्यातच मे आणि जूनच्या तीव्र उष्णतेचा तडाखा जाणवत आहे. मात्र, हवामान खात्याने दिलासा दिला आहे. एल निनोचा प्रभाव कमी असल्याने यंदा मान्सूनचा पाऊस गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच जास्त होण्याची शक्यता आहे.

    आयएमडीनुसार, पुढील 6 दिवसांसाठी हवामान अपडेट देखील दिले आहेत. येत्या 6 दिवसात बंगाल आणि सिक्कीमसह 8 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि विजांचा कडकडाट होऊ शकतो. कर्नाटक आणि गोव्यात उष्णतेची लाट येणार आहे. पुढील 6 दिवस दक्षिण भारतातील राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कायम राहणार आहे. रविवारी तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये उष्णतेची लाट कायम होती.

    याशिवाय कर्नाटक आणि तेलंगणामध्येही उष्णतेच्या लाटेचा परिणाम दिसून आला. केरळ, आंध्र प्रदेश, पुद्दुचेरी आणि गुजरातमध्ये 10 एप्रिलपर्यंत उष्ण हवामान कायम राहील. कर्नाटक आणि गोव्यात उष्णतेची लाट जाणवू शकते.

    ‘या’ राज्यात मुसळधार पाऊस

    उत्तर-पूर्वेकडील राज्यांच्या हवामानावर हवामान खात्याने दिलासा देणारी बातमी दिली आहे. आयएमडीने पुढील 6 दिवसांत अरुणाचल प्रदेश, बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये एकाकी वादळासह हलका ते मध्यम पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज वर्तवला आहे. झारखंडमध्ये 10 एप्रिलपर्यंत ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.