Photo Credit- Social Media'आज उत्तर प्रदेश गुन्हेगारी, गुंडगिरी, माफियामुक्त..'; योगी आदित्यनाथ
देवरिया (उत्तर प्रदेश): उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देवरिया जिल्ह्यात विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि शिलान्यास केले. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना मंजुरीपत्र आणि धनादेशाचे वितरणही करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री योगींनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सरकारवर जोरदार टीका केली.
मुख्यमंत्री म्हणाले की, २०१७ पूर्वी देवरिया अराजकतेच्या आणि मागासलेपणाच्या गर्तेत होता. येथेले शेतकरी स्थलांतर करण्यास भाग पडले होते. दुर्गा पूजा, होळीसारख्या सणांमध्ये लोक भीतीच्या छायेत राहत होते. घराबाहेर पडणे सुद्धा धोकादायक वाटत होते. परंतु भाजप सरकार आल्यापासून स्थिती पूर्णपणे बदलली आहे. आज देवरिया दंगामुक्त आणि माफियामुक्त झाला आहे. मुख्यमंत्री योगींनी विकास कार्यांचे कौतुक करताना सांगितले की, जिल्ह्यात नुकतेच एक चार मजली डिग्री कॉलेज सुरू झाले आहे. हे देवरियातील पहिले असे कॉलेज आहे ज्यामध्ये कला, विज्ञान आणि वाणिज्य या तीनही शाखांमध्ये एकत्रित शिक्षण मिळणार आहे.
Delhi Politics: खासगी शाळांच्या मनमाफी फी वाढीला लागणार लगाम..; दिल्लीत लागू होणार ‘फी कायदा’
मुख्यमंत्री योगींनी सांगितले की, देवरिया जिल्ह्यातील हे प्रकल्प स्थानिकांना प्रगतीची नवी दिशा देतील. आज भाजपची ओळख विकासाशी जोडली गेली आहे. राज्यात विविध एक्सप्रेस वे प्रकल्प राबवले जात आहेत. देवरियामध्येही लवकरच एक नवीन एक्सप्रेस वे सुरू होणार असून, त्यामुळे देवरियाहून थेट दिल्ली किंवा शामलीकडे जाणे अधिक सुलभ आणि जलद होईल. या महामार्गाला चार पदरी रस्त्यांशी जोडले जाणार आहे. या घडामोडींमुळे देवरिया जिल्ह्यातील विकासाला गती मिळणार असून, स्थानिक लोकांना रोजगार, शिक्षण आणि मूलभूत सुविधा यामध्ये मोठा लाभ होणार आहे.
मुख्यमंत्री योगींनी सांगितले की, आज उत्तर प्रदेशकडे देशातील सर्वात मोठे एक्सप्रेसवे नेटवर्क आहे. राज्यात सर्वाधिक मेट्रो सेवा सुरू आहेत. रेल्वेचे सर्वात मोठे जाळे देखील उत्तर प्रदेशात आहे. देशातील पहिली रॅपिड रेल आणि पहिले इनलॅंड वॉटरवेज देखील याच राज्यात सुरु आहेत. भारत सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या ४५ पेक्षा अधिक योजनांमध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर आहे. “हे नवे उत्तर प्रदेश, नव्या भारताचे प्रतीक आहे. आणि हेच उत्तर प्रदेश आता आपल्या सामर्थ्याचे दर्शन घडवत आहे. २०१७ मध्ये उत्तर प्रदेश देशातील सातव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होती, पण आज ती देशातील दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. २०२९ पर्यंत उत्तर प्रदेश एक ट्रिलियन डॉलर इकोनॉमी होईल, यावर आमचा ठाम विश्वास आहे.” असे योगी आदित्यनाथ यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री योगींनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले की, २०१४ पूर्वी उत्तर प्रदेश ओळखीच्या संघर्षातून जात होता. “ज्यांचा अजेंडा विकास नव्हता, त्यांनी उत्तर प्रदेशवर आपली इच्छित व्यवस्था लादली. त्यामुळे शेतकरी आत्महत्येपर्यंत, तरुण बेरोजगारीने त्रस्त आणि महिलांची असुरक्षितता ही राज्याची ओळख बनली होती. आज उत्तर प्रदेश केवळ भौगोलिकदृष्ट्या देशाचे हृदयस्थळ नाही, तर नव्या भारताची आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक ओळख बनत आहे.”