होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडून 2 गॅसवाहू जहाजे भारताकडे रवाना (Photo Credit- X)
शिप ट्रॅकिंग डेटाच्या माहितीनुसार, ही दोन्ही जहाजे इराणच्या लारक आणि किश्म बेटांच्या दरम्यान असलेल्या खाडीतून मार्गक्रमण करत आहेत. आपली ओळख स्पष्ट करण्यासाठी आणि इराणी नौदलाच्या तपासणी प्रक्रियेतून तांत्रिक मान्यता मिळवण्यासाठी या मार्गाचा वापर करण्यात आला. बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, आखाती देशांतून भारतापर्यंत पोहोचण्यासाठी साधारणतः दोन ते अडीच दिवसांचा कालावधी लागतो. त्यामुळे बुधवारपर्यंत हा साठा भारतात दाखल होईल.
या दोन जहाजांमधील 92,000 टन एलपीजी हा भारताच्या साधारणतः एक दिवसाच्या घरगुती गॅस वापराच्या गरजेइतका आहे. यापूर्वी ‘एमटी शिवालिक’ आणि ‘एमटी नंदा देवी’ ही जहाजे 92,712 टन एलपीजी घेऊन गुजरातच्या मुंद्रा आणि कांडला बंदरात आधीच दाखल झाली आहेत. युद्धामुळे विस्कळीत झालेली पुरवठा साखळी पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी हे टँकर्स अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.
युद्ध सुरू झाले तेव्हा होर्मुजच्या सामुद्रधुनीत भारताची एकूण 28 जहाजे अडकली होती. त्यापैकी 4 जहाजे पूर्व भागात, तर 24 जहाजे पश्चिम भागात होती. आतापर्यंत काही जहाजे सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले असले, तरी अद्याप 22 जहाजे आणि 600 भारतीय नाविक पश्चिम भागात अडकलेले आहेत. यामध्ये खालील जहाजांचा समावेश आहे:
इराण सरकार सध्या या मार्गावरून जाणाऱ्या प्रत्येक जहाजाची सखोल पडताळणी करत आहे. जहाजाची मालकी, त्यावरील माल आणि अमेरिकेशी असलेला संबंध या गोष्टींची खातरजमा केल्यानंतरच जहाजांना पुढे जाण्याची परवानगी दिली जात आहे. अडकलेल्या जहाजांवर सध्या अन्न आणि पिण्याच्या पाण्याचा पुरेसा साठा उपलब्ध असून, केंद्र सरकार सर्व 600 खलाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करत आहे.
भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी हा मार्ग अत्यंत कळीचा आहे. भारत आपल्या गरजेच्या 88% कच्चे तेल, 50% नैसर्गिक वायू आणि 60% एलपीजी आयात करतो. यातील बहुतांश पुरवठा होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होतो. युद्धजन्य परिस्थितीमुळे या मार्गावर परिणाम झाल्यास देशांतर्गत इंधन दरवाढ आणि टंचाईचे संकट निर्माण होऊ शकते, म्हणूनच या जहाजांची सुरक्षित सुटका होणे भारतासाठी अनिवार्य आहे.
LPG वजनात बदल: मासिक खर्चाचे गणित कोलमडणार? १० किलो गॅस सिलेंडरचे पूर्ण विश्लेषण






