प्रसिद्ध उद्योजक आनंद महिंद्रा यांनी सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक मुलगा चक्क उडतं विमान पकडतोय. पण हा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणतायेत, “आम्हाला तर मूर्ख बनवलं जातंय.” हा मंडे मोटिव्हेशन व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटलं? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. ट्रॅफिक पोलिसांच्या फोटोत सापडला, पण तरुण निघाला पक्का पुणेकर, उत्तर ऐकून पोलीसही झाले थक्क.
आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक भलंमोठं विमान आकाशात उडतंय. हे विमान उडता उडता एका इमारतीच्या टेरेसवर पोहोचतं. असं वाटतं की हे विमान टेरेसवर क्रॅश होणार की काय? तेवढ्यात एक मुलगा सुपरमॅन प्रमाणे हे विमान अडवतो आणि हातांनी पकडून ते घेऊन जातो. खरं तर हे एक टॉय प्लेन होतं. पण हा व्हिडीओ ज्या पद्धतीनं शूट केलाय ते पाहून विमान खरंच आहे की काय? असा भास होतो.
This fooled me till the very end.
The moral? We make our problems & fears larger than they really are. The solutions are always within our grasp. Don’t make your week appear more worrisome than it needs to me. #MondayMotivation. pic.twitter.com/Ex6jGQg4fa— anand mahindra (@anandmahindra) December 12, 2022
या व्हिडीओवर आनंद महिंद्रानी कॅप्शन दिलेलं चर्चेत आहे. “व्वा व्हिडीओच्या शेवटी काय गंडवलं आपल्याला. आपण आपल्या संकटांना असंच मोठं बनवतो. खरं तरं ती फारच लहान असतात. पण आपल्या बघण्याचा दृष्टीकोन चुकतो. या समस्यांचं समाधान आपल्या अंतर्मनात लपलेलं असतं.” अशा आशयाची कॅप्शन महिंद्रा यांनी व्हिडीओवर दिली आहे. हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होतोय.