योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरुन हटवणार? अरविंद केजरीवाल यांचा मोठा दावा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 2 ते 4 महिन्यांमध्ये पदावर हटवलणार असल्याचा मोठा दावा केला आहे.

    उत्तर प्रदेश : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. सुप्रीम कोर्टाकडून त्यांना प्रचारासाठी अंतरिम जामीन मंजुर करण्यात आला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार करत आहे. आज ते उत्तर प्रदेशमध्ये आहेत. यावेळी त्यांनी समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 2 ते 4 महिन्यांमध्ये पदावर हटवलणार असल्याचा मोठा दावा केला आहे.

    ही संयुक्त पत्रकार परिषद लखनौ येथे पार पडली. यामध्ये इंडिया आघाडीने भाजप आणि आरएसएसवर जहरी टीका केली. आरक्षण संपवणं हा त्यांचा अजेंडा आहे अशी घणाघाती टीका केजरीवाल यांनी केली. अरविंद केजरीवाल म्हणाले, “नरेंद्र मोदी अमित शाह यांच्यासाठी मतं मागत आहेत. पण मोदी पुढच्या वर्षी पंतप्रधान राहणार नाही. पुढील वर्षी 17 सप्टेंबरला अमित शाह यांना पंतप्रधान बनवण्याचा निर्णय मोदींनी घेतला आहे. अमित शाह यांच्या रस्त्यामध्ये येणाऱ्या अनेक नेत्यांना बाजूला करण्याता आला आहे. मनोहरलाल खट्टर, शिवराज सिंह चौहान यांना बाजूला करण्यात आले आहे. देवेंद्र फडणवीस यांना संपवलं. आता योगी आदित्यनाथ यांना हटवण्याचा प्रयत्न चालू आहे,” असा दावा अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

    पुढे अखिलेश यादव भाजपवर निशाणा साधताना म्हणाले, त्यांना लोकसभेला 400 पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. कारण त्यांना आरक्षण काढायचं आहे. आरक्षणा संपवणं हा भाजप आणि आरएसएसचा अजेंठा आहे. भाजपने चारशे पारचा नारा दिलाय. कारण त्यांना पहिला हल्ला आरक्षणावर करायचा आहे. आम्ही संविधान वाचवण्यासाठी लढत आहोत. संविधान वाचवलं तर लोकशाही वाचेल. देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपच्या जागा कमी झाल्या आहेत, असं वक्तव्य अखिलेश यादव यांनी केलं.