नवी दिल्ली : नवे किंवा तरुण खासदार (Member Of Parliament) यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी (Bright Future) त्यांना सभागृहात जास्त संधी द्यावी. त्यांचा सभागृहाच्या कामकाजातील सहभाग वाढला पाहिजे. सभागृहात होणारा गोंधळ, स्थगिती यामुळे खासदारांचे नुकसान होत असल्याचे मला अनेकांनी सांगितले. त्यांच्या वेदना तुम्ही समजून घ्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सर्व पक्षाच्या प्रमुखांना केले. संसदेचे (Parliament) हिवाळी अधिवेशन (Winter Session) आजपासून सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी संवाद साधला.
I urge Leaders of all political parties & all Floor Leaders that we give more and more opportunities to the first-time MPs, the new MPs, the young MPs for their bright future and to prepare the future generation of democracy & that their participation in discussions increase: PM pic.twitter.com/q4KF0GWuVJ
— ANI (@ANI) December 7, 2022
नुकतीच माझी सर्व पक्षाच्या प्रमुखांशी चर्चा झाली. सभागृहातही याचे प्रतिबिंब नक्कीच दिसेल. देशाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी या अधिवेशनात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्याचा प्रयत्न असेल. सर्व राजकीय पक्ष चांगली चर्चा करतील, तसेच, आपल्या विचारांनी निर्णयांना बळ देतील अशी आशा आहे, असे नरेंद्र मोदींनी सांगितले.
When I unofficially met MPs of almost all political parties in past few days, they said that when ruckus takes place in House&it gets adjourned, it affects MPs. Youth MPs say that when proceedings don’t go on&discussions aren’t held,they get devoid of learning & understanding: PM pic.twitter.com/JTmYkRryBe
— ANI (@ANI) December 7, 2022
मी सर्व पक्षाचे अध्यक्ष आणि सभागृह नेत्यांना आवाहन करतो की, नवे किंवा तरुण खासदार यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि भावी पिढीला तयार करण्यासाठी त्यांना जास्त संधी द्यावी. त्यांचा सहभाग वाढला पाहिजे. सभागृहात होणारा गोंधळ, स्थगिती यामुळे खासदारांचे नुकसान होत असल्याचे अनेकांनी सांगितले. आम्हाला जे शिकायचे आहे, त्यापासून आम्ही दूर राहतो अशी त्यांची खंत आहे. त्यामुळे सभागृहाचे काम चालणे महत्वाचे आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.