सध्या उत्तर प्रदेशची एक महिला न्यायाधिश चर्चेत आहे. अर्पिता साहू ( Arpita Sahu) बांदा येथे दिवाणी न्यायाधीश असून त्यांनी भारताचे सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड यांना एक पत्र लिहिले आहे. यामध्ये त्याने शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून जीवन संपवण्याची परवानगी मागितली आहे. या पत्राद्वारे त्यांनी जिल्हा न्यायाधीशांकडे अवास्तव मागण्या केल्याचा आरोप केला आहे. रात्री उशिरा भेटण्यासाठी दबाव निर्माण केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यावेळी त्यांनी कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नही उपस्थित केले आहेत.
[read_also content=”मुंबईकराची कमाल, वर्षभरात स्विगीवरुन 42.3 लाखाचं फूड ऑर्डर; तर ‘या’ खाद्यपदार्थाची होती सर्वाधिक मागणी! https://www.navarashtra.com/india/a-user-from-swiggy-ordered-online-food-of-rs-42-3-lakh-nrps-489024.html”]
अर्पिता साहू यांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहिले आहे. यावेळी त्यांनी बाराबंकी न्यायालयात त्यांच्या नियुक्तीदरम्यान घडलेल्या घटनांबद्दल सांगितले. न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तादरम्यान, दोन पानी पत्रात त्यांनी जिल्हा न्यायाधीशांकडून केलेल्या अवास्तव मागण्या आणि नंतर होणारा छळ यांचा उल्लेख केला आहे. अनेकवेळा तक्रार करूनही तिला हे पत्र लिहिण्यास भाग पाडले जात असल्याचे तिचे म्हणणे आहे.
रिपोर्टनुसार, तिने पत्रात असेही म्हटले आहे की, ‘मी इतरांना कसा न्याय देऊ, जेव्हा मला स्वतःलाच काही आशा नाही. सर्वोच्च न्यायालय माझी प्रार्थना ऐकेल असे मला वाटले होते, पण माझी प्रार्थना ऐकून किंवा विचार न करता रिट याचिका 8 सेकंदातच फेटाळण्यात आली. मला असे वाटते की माझे जीवन, माझा सन्मान आणि माझा आत्मा देखील नाकारला गेला आहे. हा वैयक्तिक अपमान वाटतो.
त्यांनी लिहिले, ‘मला आता जगण्याची इच्छा नाही. गेल्या दीड वर्षात माझे रुपांतर चालत्या प्रेतात झाले आहे. आत्मा आणि निर्जीव शरीराशिवाय हिंडण्यात अर्थ नाही.
2022 मध्ये बाराबंकी येथे तैनात असताना न्यायाधीश साहू यांनी रितेश मिश्रा आणि मोहन सिंग नावाच्या दोन वकिलांच्या विरोधातही तक्रार दाखल केली होती. वकिलांनी अपशब्द वापरल्याचा त्यांचा आरोप होता. जुलैमध्येच अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश दिले होते.






