योगगुरू बाबा रामदेव यांच्या मेणाच्या पुतळ्याचे दिल्लीत अनावरण; ‘मॅडम तुसाद म्युझियम’मध्ये प्रथमच संन्यासीचा पुतळा

योगगुरु रामदेव बाबा यांचा न्यूयॉर्क येथील मॅडम तुसाद म्युझियममध्ये मेणाचा पुतळा बसवण्यात येणार आहे. रामदेव बाबा हे पहिलेच भारतीय साधू असतील ज्यांचा मेणाचा पुतळा लंडनच्या मॅडम तुसादमध्ये बसवला जाणार आहे.

    नवी दिल्ली : योगगुरु रामदेव बाबा (Baba Ramdev) यांचा न्यूयॉर्क येथील मॅडम तुसाद म्युझियममध्ये मेणाचा पुतळा बसवण्यात येणार आहे. रामदेव बाबा हे पहिलेच भारतीय साधू असतील ज्यांचा मेणाचा पुतळा लंडनच्या मॅडम तुसादमध्ये बसवला जाणार आहे. याआधी लंडनमधील या म्युझियममध्ये महात्मा गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यासह जवळपास 12 सेलिब्रिटींचे पुतळे लावण्यात आले आहेत.

    दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात खुद्द योगगुरू बाबा रामदेव यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे. यावेळी पतंजली योगपीठचे सह संस्थापक आचार्य बालकृष्ण आणि पतंजली योगपीठ (यूके) ट्रस्टच्या संस्थापक ट्रस्टी सुनीता पोद्दार हे उपस्थित होते. यादरम्यान बाबा रामदेव यांनी म्हटले की, पुतळा बनवण्यापूर्वी 2018 मध्ये तुषाद न्यूयॉर्कच्या टीमने दोनशेहून अधिक वेळा शरीराचे मोजमाप केले होते. यावेळी टीमने त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव रेकॉर्ड करून शेकडो फोटो काढले.

    म्युझियममधील पहिले संन्यासी

    मॅडम तुसाद न्यूयॉर्कमध्ये बाबा रामदेव यांचा मेणाचा पुतळा वृक्षासन पोझमध्ये दिसणार आहे. ही प्रतिकृती सोहळ्यासाठी दिल्लीत पोहोचली असून समारंभानंतर न्यूयॉर्कला रवाना होणार आहे. पतंजली योगपीठाचे केंद्रीय प्रवक्ते एसके तिजारावाला यांच्या मते, हा भारतीय संस्कृती, संन्यास आणि सनातन योग परंपरेसाठी जागतिक प्रतिष्ठेचा ऐतिहासिक क्षण आहे. योग गुरु बाबा रामदेव हे मॅडम तुसाद म्यूझियममध्ये जागा मिळवणारे पहिले भारतीय संन्यासी असल्याचे पतंजलीने दावा केला आहे.