साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन (allu arjun) याचा पुष्पा 2 (Pushpa 2) चित्रपट या वर्षी ऑगस्ट महिन्यात भेटीला येणार आहे. पुष्पाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर आता लवकरच याचा दुसरा भागही तुफान गाजणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता अल्लुचे चाहतेही मोठ्या आतुरनेने पुष्पा 2 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच अल्लुनं त्याच्या चाहत्यांना एक सरप्राईज दिलं आहे. अल्लूनं पुष्पा 2 रिलीज व्हायच्या आधी पुष्पा 3 ची घोषणा केली आहे.
[read_also content=”जगद्गुरू रामभद्राचार्य आणि गुलजार यांना ज्ञानपीठ पुरस्कार! समितीने केली घोषणा https://www.navarashtra.com/movies/urdu-poet-gulzar-and-sanskrit-scholar-jagadguru-rambhadracharya-selected-for-58th-jnanpith-award-nrps-508083.html”]
अल्लूनं नुकतंच बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हजेरी लावली होती. यावेळी त्यानं पुष्पा 3 बद्दल भाष्य केलं. अल्लू अर्जुन म्हणाला,”पुष्पा 3’ची तुम्ही प्रतीक्षा करू शकता. आम्ही या कलाकृतीची फ्रेंचायजी बनवण्यास उत्सुक आहोत. अनेक नव्या कल्पनांचा आम्ही विचार करत आहोत. आता परदेशी सिनेप्रेमी आपला सिनेमा किती डोक्यावर घेतील हे पाहावे लागेल. कोणत्या पद्धतीचे सिनेमे पाहायला प्रेक्षकांना आवडतील याचा मला अभ्यास करायचा आहे”.
‘पुष्पा’ हा सिनेमा 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली. देशभरात हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. आता या सिनेमाचा दुसरा भाग अर्थात ‘पुष्पा 2’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे. 15 ऑगस्ट 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ‘पुष्पा’ या सिनेमाने जगभरात 350 कोटींची कमाई केली होती. आता या सिनेमाचा दुसरा भाग किती गल्ला जमवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.