महाराष्ट्रात भाजपच मोठा भाऊ; मुख्यमंत्र्यांबाबत अमित शहांचे विधान
हरयाणा: काँग्रेसचे राहुलबाबा हे खोटे बोलण्याचे यंत्र आहे. पेन्शन देण्याची इच्छा नसल्याने सरकारला अग्निवीर योजना आणल्याचे ते म्हणत आहेत. पण आपल्या सैन्याला कायम तरुण ठेवण्यासाठीच ही योजना तयार करण्यात आली आहे. असे सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींवर निशामा साधला आहे. हरयाणातील बादशाहपूर येथे एका निवडणूक सभेला संबोधित करताना बोलत होते.
हरयाणा विधानसभा निवडणुका काही दिवसांवर आल्या आहेत. हरियाणामध्ये ५ ऑक्टोबरला मतदान आहे. हरियाणातील विधानसभेच्या 90 जागांवर एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 8ऑक्टोंबरला निकाल जाहीर होणार आहेत. राजकारण तापले आहे.
हेही वाचा: इंदापुरातून हर्षवर्धन पाटलांच्या उमेदवारीला विरोध; काय आहे कारण?
या पार्श्वभूमीवर अमित शाहांनी बादशाहपूर येथे सभेला संबोधित करत राज्य राहुल गांधींवर निशाणा साधला. अमित शाह म्हणाले, “तुमच्या मुलांना सैन्यात पाठवण्याआधी अजिबात संकोच करू नका, असे मला सांगायचे आहे, ५ वर्षानंतर एकही अग्निवीर पेन्शनपात्र नोकरीशिवाय राहणार नाही. याबाबत कोणीही काळजी करण्याची गरज नाही. पण मी हरियाणात एक नवीन ट्रेंड पाहत आहे. हातीनपासून ठाणेसरपर्यंत आणि ठाणेसरपासून पलवलपर्यंत काँग्रेसच्या व्यासपीठांवर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जात आहेत.
अमित शाह म्हणाले की, मला राहुल गांधींना विचारायचे आहे की, काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देत असताना तुम्ही गप्प का आहात? काँग्रेस तुष्टीकरणात आंधळी झाली आहे. काश्मीर आमचा आहे की नाही? आम्ही कलम 370 परत आणू असे काँग्रेस आणि राहुल बाबा म्हणत आहेत. राहुल गांधींच्या तीन पिढ्याही कलम 370 परत आणू शकत नाहीत. हरयाणाच्या तरुणांनी काश्मीरच्या रक्षणासाठी खूप बलिदान दिले आहे आणि आम्ही ते व्यर्थ जाऊ देणार नाही.वक्फ बोर्डाच्या या कायद्यात अनेक अडचणी असून या हिवाळी अधिवेशनात आम्ही ते दुरुस्त करण्याचे काम करू. असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा: हरयाणात कोणचा विजय होणार?; निवडणूक तज्ज्ञ योगेंद्र यादवांनी सांगितल्या तीन शक्यता