फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर रोज काही ना काही व्हारल होत असते. कधी डान्स रील्स, तर कधी जुगाड व्हिडिओ तर कधी भांडणाचे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. तुम्ही लहान मुलांचे देखील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील.सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. जो उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ खूप छान आणि प्रेरणादायी आहे.
भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांना प्रत्येकजण ओळखतात. तुम्हाला माहित असेल की, आनंद महिंद्रा त्याच्या व्यवसायावर जितके लक्ष देतात तितकेच ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय असतात.ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेहमी लोकांना प्रेरणा मिळेल असे व्हिडिओ शएअर करत असतात. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे जो तुम्हाला नक्कीच आवडेल. एका लहान मुलाचा वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे.
आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये मुलाचे आई-वडील त्याला एक वेटलिफ्टर उचलण्यास सांगत आहेत. ते त्याला तू करू शकतोस असे म्हणत प्रोत्साहित करत आहेत. मूलही ते उचलण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते.स्पर्धेमध्ये सहभागी ज्या प्रकारे वजन उचलतो,त्याच पद्धतीने मूल वजन उचलण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी ते उचलतो. मुलाचा हा व्हिडिओ आनंद महिंद्रा यांच्या हृदयाला स्पर्शून गेला आणि त्यांनी तो आपल्या एकेसवर शेअर केला आहे. ते म्हणतात की, जर हा लहान मुलगा ती गोष्ट करू शकतो तर तुम्हीही करू शकता. कोणत्याही गोष्टीचा प्रयत्न केल्याशिवाय हार मानू नये.
व्हिडिओ
You can lift burdens far greater than you think you can.
If he can do it… you can too#MondayMotivation pic.twitter.com/2NVWnM4JOm
— anand mahindra (@anandmahindra) September 23, 2024
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ शेअर करताना आनंद महिंद्रा यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तुम्ही तुमच्या विचारापेक्षा जास्त भार उचलू शकता. जर तो हे करू शकत असेल तर तुम्हीही करू शकता. वृत्त लिहेपर्यंत हा व्हिडिओ 6 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले – जे प्रयत्न करतात ते कधीही हार मानत नाहीत. दुसऱ्या यूजरने लिहिले – हे खूप गोंडस आहे, माझी इच्छा आहे की मी देखील असे करू शकलो असतो. तिसऱ्या यूजरने लिहिले – तो अगदी लहान वयात वेटलिफ्टिंगचा सराव करत आहे. आणखी एका युजरने लिहिले – व्वा, किती धाडसी बालक आहे.