BCCI Announces Sri Lanka Tour Schedule : चॅम्पियन्स ट्रॉफीकरिता पाकिस्तानला जाण्याचे नाकारल्यानंतर बीसीसीआयकडून लगेच श्रीलंका दौऱ्याचे शेड्यूल जाहीर करण्यात आले आहे. बीसीसीआयने श्रीलंका दौऱ्याचे पूर्ण वेळापत्रकच ट्विट करीत याची माहिती दिली. भारतीय संघ होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीकरिता पाकिस्तानला जाण्यास जवळ जवळ नकार दिला आहे.
बीसीसीआयकडून श्रीलंका दौऱ्याचे शेड्यूल
🚨 NEWS 🚨
Fixtures for the upcoming India tour of Sri Lanka announced! 📢#TeamIndia | #SLvIND pic.twitter.com/oBCZn0PlmK
— BCCI (@BCCI) July 11, 2024
BCCI कडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे शेड्यूल
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 संदर्भात सकाळीच मोठी अपडेट आली होती. भारतीय क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नाही. त्याचे सामने श्रीलंका किंवा दुबईत खेळवण्याची मागणी तो करणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करणार नाही. तो ICC ला आपले सामने श्रीलंका किंवा दुबईत आयोजित करण्यास सांगणार आहे. त्यामुळे जवळ जवळ चॅम्पियन्स ट्रॉफीला न जाण्याचे संकेत बीसीसीआयने दिले होतेच, परंतु आता श्रीलंका दौऱ्याचे आयोजन आणि शेड्यूल टाकत हे स्पष्टच केले आहे.
या कारणाने बीसीसीआयने जाणे नाकारले
भारतीय सीमेवरील दहशतवादी कारवायांमध्ये पाकिस्तानच्या सतत सहभागामुळे पहिली द्विपक्षीय मालिका बंद आहे. सीमेवर त्याचे नापाक इरादे वेळोवेळी उघड होत असतात, तर त्याचे राजकारणी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरुद्ध आग भडकवण्याचे धाडस करत असतात. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे वेळापत्रक अद्याप आलेले नाही, परंतु तात्पुरते वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) आयसीसीकडे तारखा आणि ठिकाणांसह प्रस्तावित सामन्यांची यादी पाठवली आहे.
त्यानुसार चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आठ संघांची ही स्पर्धा तीन ठिकाणी आयोजित केली जाईल, ज्यामध्ये कराची, रावळपिंडी आणि लाहोर येथे १९ फेब्रुवारी ते ९ मार्च या कालावधीत सामने खेळवले जातील. 19 फेब्रुवारीला सुरुवात होईल, तर अंतिम सामना 9 मार्चला होणार आहे. 50 षटकांच्या फॉर्मेटसह आयसीसी ही स्पर्धा जवळजवळ 8 वर्षांनंतर आयोजित करीत आहे. त्यात गेल्या वर्षीच्या एकदिवसीय विश्वचषकातील अव्वल आठ संघांचा समावेश असेल. आठ संघांची चारच्या दोन गटात विभागणी केली जाईल, प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील. यजमान पाकिस्तान कट्टर प्रतिस्पर्धी भारत, बांगलादेश आणि न्यूझीलंडसह अ गटात आहेत, तर ब गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे.