ऐमन अनवरने घेतली निवृत्ती (फोटो- istockphoto)
आशिया कप स्पर्धेच्या आधी पाकिस्तान क्रिकेट संघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महिला संघातील वेगवान गोलंदाज असलेल्या ऐमन अनवरने निवृत्ती घेतली आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमधून तिने निवृत्ती जाहीर केली आहे. तिने याबाबतची माहिती पाकिस्तान क्रिकेट बोर्डला दिली आहे. तिने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मात्र तिने पूर्णपणे क्रिकेटशी आपले नाते तोडले नसल्याचे समोर येत आहे.
पाकिस्तानची वेगवान गोलंदाज ऐमन अनवरने 32 व्या वर्षी इंटरनॅशनल क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर अनवर अंपायर आणि ब्रॉडकास्टर म्हणून आपली नवीन कारकीर्द सुरू करणार आहे. नुकतीच टीमने पाकिस्तानच्या राष्ट्रीय महिला यू 19 स्पर्धेत मॅच रेफ्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
ऐमन अनवरne 2016 मध्ये इंग्लंडविरुद्ध टी 20 आणि 2017 मध्ये बांग्लादेशविरुद्ध वंडे क्रिकेटमध्ये डेब्यू केले होते. तसेच तिने पाकिस्तानकडून खेळताना 8 वनडे सामने आणि 37 टी 20 सामने खेळले आहेत. तसेच तिने 2018, 2020 आणि 2023 च्या आयसीसी महिला टी 20 वर्ल्डकपमध्ये व 2022 मध्ये वनडे वर्ल्डकपमध्ये सहभाग घेतला होता.
गेलेली अब्रू वाचली, पण…! Pakistan ची १४ व्या क्रमांकावरील नेदरलँड्सवर कशीबशी मात, स्पर्धेचा शेवट गोड
क्रिकेटच्या मैदानावरील खेळाडू म्हणून निवृत्ती घेतलेल्या ऐमन अनवरने फेब्रुवारी 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आपला शेवटचा टी 20 सामना खेळला होता.






