नवी दिल्ली : नॅशनल हेरॅाल्ड ( National Herold) या प्रकरणी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज चौकशी करण्यात येणार आहे. आज पुन्हा एकदा सोनिया गांधी ईडी चौकशीला सामोरे जाणार आहेत. आज साधारण दुपारच्या सुमारास त्या ईडी कार्यालयात हजर होणार आहेत. यापूर्वी २१ जुलैला ईडीने सोनिया गांधींची तब्बल दोन तास चौकशी केली होती.
[read_also content=”हकालपट्टीवर मुख्यमंत्री शिंदे यांची मलमपट्टी ! खासदार प्रतापराव जाधव पुन्हा शिवसेना संपर्कप्रमुख https://www.navarashtra.com/maharashtra/expulsion-of-chief-minister-shinde-prataprao-jadhav-is-shiv-senas-liaison-chief-again-nraa-308162.html”]
यापूर्वी झालेल्या चौकशीत ईडीने त्यांनी सलग दोन तास विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी एजन्सीच्या कमीत कमी 28 प्रस्नांवाना उत्तरं दिलं होती. नॅशनल हेरॉल्डचा मालकी हक्क असलेल्या यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेत कथित आर्थिक अनियमितता झाल्याप्रकरणी सोनिया गांधी यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, संसदेबाहेर काँग्रेस नेते या कारवाईचा विरोध करणार आहेत. तसेच संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. त्यामुळे अधिवेशनातदेखील काँग्रेस नेते मोदी सरकारवर या मुद्द्यावरून जोरदार टीका करणार आहेत.