राज्यात उष्णतेची तीव्रता वाढण्याची शक्यता (फोटो- ai gemini)
पुणे: उत्तर आणि मध्य भारतातील बहुतांश भागांमध्ये आठवडाभर चाललेल्या उष्णतेच्या लाटेचा मागील आठवड्यातील हलक्या ते मध्यम पावसामुळे शेवट झाला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) ताज्या अंदाजानुसार, पुढील किमान दोन आठवडे तरी उष्णतेची लाट परत येण्याची शक्यता कमी आहे. मात्र, हा दिलासा तात्पुरता असून येत्या काळात परिस्थिती पुन्हा बदलू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
आयएमडीच्या निकषांनुसार, एखाद्या ठिकाणचे कमाल तापमान सरासरीपेक्षा किमान ५ अंश सेल्सियसने जास्त राहून ती स्थिती सलग दोन दिवस टिकल्यास ‘हीटवेव्ह’ घोषित केली जाते, तर ७ अंशांनी वाढ झाल्यास ‘तीव्र उष्णतेची लाट’ घोषित होते. प्रदेशाचे भौगोलिक स्वरूप आणि सामान्य तापमानही या घोषणेत विचारात घेतले जाते.
राज्यात उष्माघाताचा कहर! दोन महिन्यांत तब्बल 8 बळी, वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ
अतिउष्णतेचा GDP फटका ! गर्मीच्या लाटेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर संकट; वीज आणि रोजगारावरही परिणाम






