अलीकडे काही दिवसात देशात वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे (India Corona Update) देशाची चिंता वाढत असताना काल म्हणजे मंगळवारी (26 एप्रिल) देशातील कोरोना रुग्णांमध्ये किंचित घट पाहयला मिळाली. मंगळवारी 24 तासात देशात कोरोनाच्या नव्या 6660 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. मात्र, आज पुन्हा ही रुग्णसंख्या वाढलेली दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 9,629 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असुन 24 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 65,683 वरून वर 61,013 वर आली आहेत.
गेल्या 24 तासात देशात 29 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील मृतांची एकूण संख्या 5,31,398 वर गेली आहे, ज्यामध्ये केरळमधील सर्वाधिक मृत्यूचा समावेश आहे. गेल्या 24 तासात केरळमधे 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दिल्लीत सहा, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी तीन, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी दोन आणि ओडिशा, गुजरात आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी एकाचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील दैनिक सकारात्मकता दर 5.38 टक्के आणि साप्ताहिक सकारात्मकता दर 5.61 टक्के नोंदविला गेला आहे. तर राष्ट्रीय कोविड-19 पुनर्प्राप्ती दर म्हणजेच कोरोना रिकव्हरी रेट 98.68 टक्के नोंदवला गेला आहे. आतापर्यंत 4,43, 11,078 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर, मृत्यूचे प्रमाण 1.18 टक्के नोंदवले गेले आहे. दरम्यान, देशातील सक्रिय प्रकरणे 63,380 आहेत, जी एकूण संसर्गाच्या 0.14 टक्के आहेत, तर रुग्ण बरे होण्याचा दर 98.67 टक्के नोंदवला गेला आहे.
मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे 220.66 कोटी डोस देण्यात आले आहेत. 16 जानेवारी 2021 रोजी आरोग्यसेवा कर्मचार्यांसह लसीकरण मोहीम राबविण्यात आली. फ्रंटलाइन कोविड कामगारांचे लसीकरण २ फेब्रुवारीपासून सुरू झाले.