ICC Men’s T20I Team of the Year 2024 : रोहित शर्माला मिळाला ICC कर्णधार होण्याचा सन्मान, 4 भारतीय खेळाडूंना मिळाली जागा, बुमराह वेगवान गोलंदाजांचा म्होरक्या
Mumbai Indians : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समध्ये राहणार की नाही, ही चर्चा सध्याच्या घडीला सुरु झाली आहे. पण, आता भारताच्या क्रिकेटपटूनेच रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्ससोडून कोणत्या संघात जाणार, हे स्पष्ट केले आहे. रोहित शर्माचे कर्णधारपद मुंबई इंडियन्सने या वर्षीच काढून घेतले होते. त्यावेळीच रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा संघ सोडणार, असे म्हटले जात होते. पण, त्यावेळी मोठा लिलाव होणार नव्हता.
रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या बाहेर जाणार नाही……
त्यामुळे रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या बाहेर पडला नव्हता, असे म्हटले गेले. पण आता पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये मोठा लिलाव होणार आहे. त्यामध्ये जर रोहित शर्मा मैदानात उतरला तर त्याला रेकॉर्ड ब्रेक किंमत मिळू शकते, असे म्हटले जात आहे. भारताच्या खेळाडूनेही आता रोहित शर्मा कोणत्या संघात जाणार, हे स्पष्टपणे सांगितले आहे.
लिलावाबाबत महत्त्वाची अपडेट
भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राने यावेळी सांगितले की, ” मुंबई इंडियन्सच्या संघात रोहित शर्मा कायम राहणार की नाही, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. पण जर मला विचाराल तर रोहित शर्माच यापुढे मुंबई इंडियन्सच्या संघात राहणार नाही. कारण कोणताही संघ किंवा खेळाडू फक्त एका वर्षाचा नाही तर तीन वर्षांचा विचार करणार आहे. रोहित मुंबई इंडियन्समध्ये राहणार की नाही या गोष्टीचे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. पहिली गोष्ट मुंबई इंडियन्सचा संघ रोहितला रीलीज करू शकते. पण जर तसे घडले नाही तर रोहित शर्मा मुंबई इंडिन्सला सोडू शकतो. पण त्यानंतरही अजून एक महत्वाची गोष्ट समोर येत आहे आणि ती आहे लिलावाबाबत.”
रोहित शर्माला लिलावात सहभागी
आकाश पुढे म्हणाला की, ” रोहित शर्माला लिलावात सहभागी व्हावे लागेल, असेच नाही. कारण रोहित शर्माला आयपीएलच्या ट्रेड विंडोच्या माध्यमातूनही दुसऱ्या संघात जाता येऊ शकते. त्यासाठी रोहितला संघात स्थान देण्यासाठी कोणता संघ उत्सुक आहे, हे पाहावे लागेल. रोहितसाठी या ट्रेडची शक्यता सर्वात जास्त वाटत आहे. पण जर रोहित ट्रेडिंगमधून दुसऱ्या संघात गेला नाही तर त्याला लिलावात उपलब्ध व्हावे लागेल.
रोहित शर्मासाठी लखनऊ सुपर जायंट्सचा संघ उत्सुक
रोहित जर लिलावात उपलब्ध राहील तर त्याच्यावर किती बोली लागते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. हे बघा सरळ साधी गोष्ट आहे, पण प्रत्येक संघाला चांगला कर्णधार हवाच असतो. रोहितसारखा अनुभवी कर्णधार प्रत्येकालाच आपल्या संघात असावा, असे वाटू शकते.”
रोहित शर्मासाठी लखनऊ सुपर जायंट्सचा संघ उत्सुक असल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता रोहित शर्माल लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल.