फोटो सौजन्य : Cricbuzz
करुण नायरचे इंग्लडविरुद्ध शतक : एक असतो जो आवडीसाठी खेळत असतो आणि एक असतो जो भुकेसाठी खेळत असतो. भारतासाठी 300 हून अधिक धावा एका कसोटी सामन्यात करणारा खेळाडूला आठ वर्ष संधी न मिळाल्यानंतर जेव्हा त्याला पुन्हा संधी दिली जाते तेव्हा तो खेळाडू पुन्हा एकदा भारताच्या क्रिकेटच्या चाहत्यांना सिद्ध करून दाखवतो. मी अजूनही स्किलची फलंदाजी करतो तेवढ्याच धावा पुन्हा करण्याची माझ्याl ताकद आहे. भारतीय संघामध्ये आठ वर्षानंतर करून नायर याला संधी मिळाल्यानंतर आणखी एकदा त्याने संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे.
भारतीय अ संघाचा आज इंग्लंडविरुद्ध पहिला कसोटी सामना सुरू आहे आणि या सामन्यात आणखी एकदा करून नायर याने शतकीय खेळी खेळले आहे. भारतीय संघाने जेव्हा दोन विकेट्स लवकर गमावल्यानंतर करून नायर याने भारतीय संघाचा खेळ सांभाळला आणि भारतासाठी आणखी एक शतक नावावर केले आहे. टीम इंडियासाठी आठ वर्ष संधी न मिळाल्यानंतर त्याचबरोबर आयपीएलमध्ये दोन वर्ष ड्रॉप झाल्यानंतर भारतीय संघामध्ये पुनरागमन करण्यासाठी करूण नायर सज्ज झाला आहे.
आजच्या सामन्यात त्याने 155 चेंडूंमध्ये 101 धावा करून शतक पूर्ण केले आहे हे त्याचे फर्स्ट क्लास क्रिकेटमधील त्याचे 24 वे शतक आहे. करून नायर याला सरफराज खानने देखील साथ दिली. सरफराज खान ह्याचे आठ धावांनी शतक चुकले. त्याने 119 चेंडूंमध्ये 92 धावा केल्या आणि विकेट गमावली. या दोघांनी आज कमालीची फलंदाजी पहिल्या दिनी केली.
HUNDRED FOR KARUN NAIR…!!!!
– What a comeback, a grand return into the team & scored a terrific Hundred against England Lions, great news for Team India in the Test series. 🇮🇳 pic.twitter.com/ExtyNGTjK6
— Johns. (@CricCrazyJohns) May 30, 2025
ध्रुव जुरेल याने आज सरफराज खान याचा विकेट गेल्यानंतर कमालीची फलंदाजी केली आहे. ध्रुव जुरेल याने आज प्रभावशाली खेळ खेळले त्यांनी 48 चेंडूंमध्ये 52 धावा केल्या. भारताच्या संघाने पहिल्याच दिनी ३५० धावांचा आकडा पार केला आहे.
आजच्या भारतीय खेळाडूंच्या फलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर सरफराज खान करून नायर आणि ध्रुव जुरेल यांनी कौतुकास्पद कामगिरी केली आहे. या तीनही खेळाडूंनी अर्धशतकीय खेळी खेळले आहे त्याचबरोबर करून नायर हा त्याच्या द्विशतक पूर्ण करण्यासाठी काहीच धावा दूर आहे.