IND vs WI ODI Series: भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. याच्या दोनच दिवसांपूर्वी टीम इंडियाच्या संघात आणखी एका नावाचा समावेश झाल्याची बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने इशान किशनला संघात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.
एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड यांना सध्या कोरोनाची लागण झाली आहे. केएल राहुलही पहिल्या वनडेसाठी उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत बीसीसीआयने इशान किशनला संघात सामील करण्याचा निर्णय घेतला आहे. तो कर्णधार रोहित शर्मासोबत भारतीय डावाची सुरुवात करताना दिसू शकतो.
इशान किशनला वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय संघातून वगळण्यात आले होते, मात्र टी-20 संघात त्याचा समावेश करण्यात आला होता. निवड समितीच्या नव्या निर्णयामुळे आता त्याला एकदिवसीय संघाचा भाग बनण्याचीही संधी मिळणार आहे. ईशान किशनला वनडे संघात समाविष्ट करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे कारण तो आधीच बायो बबलमध्ये उपस्थित आहे.
भारत-वेस्ट इंडिज मालिका ६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे
भारत आणि विंडीज यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ६ फेब्रुवारीला होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील सर्व सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवले जातील. भारतीय संघाने यासाठी सरावही सुरू केला आहे. वेस्ट इंडिज संघानेही क्वारंटाईनचे नियम पूर्ण केल्यानंतर सराव सुरू केला आहे.
मालिकेपूर्वीच कोरोनाचे संकट टीम इंडियावर आले
एकदिवसीय मालिकेपूर्वी टीम इंडियाचे चार खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. यामध्ये सलामीवीर शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज नवदीप सैनी यांचा समावेश होता. निवडकर्त्यांनी लगेचच मयंक अग्रवालचा संघात समावेश करण्याची घोषणा केली.