मोहाली: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडिया नाणेफेक जिंकून फलंदाजी करत आहे. उपाहारापर्यंत भारताने २६ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात १०९ धावा केल्या. विराट कोहली १५ धावा आणि हनुमा विहारी ३० धावांवर खेळत आहेत. दोघांमध्ये २९ धावांची भागीदारी झाली आहे.
भारतीय संघाला ५२ धावांच्या स्कोअरवर पहिला धक्का बसला. कर्णधार रोहित शर्मा २८ चेंडूत २९ धावा करून बाद झाला. त्याचवेळी संघाची दुसरी विकेट ८० धावांवर पडली. मयंक अग्रवाल ३३ धावा करून बाद झाला.
पहिल्या कसोटीत रहाणे आणि पुजाराच्या जागी हनुमा विहारी आणि श्रेयस अय्यरला संधी मिळाली. भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये ३ फिरकीपटू आणि २ वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे.कोहलीच्या १०० व्या कसोटीदरम्यान त्याला विशेष कॅप देण्यात आली होती. यावेळी त्यांची पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित होती.
पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि जयंत यादव.
श्रीलंकेचा प्लेइंग इलेव्हन: दिमुथ करुणारत्ने, लाहिरू थिरिमाने, पथुम निसांका, चरित अस्लंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजय डी सिल्वा, निरोशन डिकवेला, सुरंगा लकमल, विश्व फर्नांडो, लसिथ एम्बुल्डेनिया आणि लाहिरू कुमारा.