IPL Updates: पंजाब किंग्सने मयंक अग्रवालला १२ कोटी देऊन आयपीएल २०२२ साठी कायम ठेवले आहे. मयंक २०१८ पासून या संघाचा भाग आहे. आता या भारतीय फलंदाजाला पंजाब किंग्जचा कर्णधार बनवता येईल. फ्रेंचायझी लवकरच त्याची घोषणा करेल.
पंजाबने एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावलेले नाही.गेल्या हंगामात संघाचा कर्णधार केएल राहुल होता. जो आता लखनऊ संघाचा भाग असेल.
गेल्या मोसमात केएल राहुल कर्णधार असताना मयंकने काही सामन्यांमध्ये त्याच्या अनुपस्थितीत पंजाबचे नेतृत्वही केले होते. पीटीआयशी बोलताना फ्रँचायझीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मयंकच संघाचा कर्णधार असेल अशी शक्यता आहे. या आठवड्याच्या अखेरीस याबाबतची घोषणा केली जाईल.