मयुरी यशवंत जांभुळकर mpsc परिक्षा पास होऊन गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली (फोटो - टीम नवराष्ट्र)
वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात शिक्षण घेणारी शेतकरी कुटुंबातील मयुरी यशवंत जांभुळकर (भेगडे) हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या ( एमपीएससी) परीक्षेत यश मिळविले आहे. नुकतीच तिची गटविकास अधिकारी म्हणून निवड झाली आहे. वडगाव मावळमधील या कन्येचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. तिच्या यशामुळे वडगाव मावळमधील लोकांनी समाधान आणि कौतुक व्यक्त केले आहे.
तिने एमपी एससीच्या परीक्षेत चांगले यश मिळवून या पदापर्यंत पोहोचली. मयुरीचा शेतकऱ्याच्या घरात जन्म झाला वडील यशवंत जांभुळकर व आई मंदा वहिले दोन्हीही राष्ट्रीय खेळाडू यशवंत जांभुळकर हे कबड्डी व वेटलिफ्टिंग मध्ये राष्ट्रीय खेळाडू व मंदा वहिले (जांभुळकर) या अथलेटिक्स मध्ये रनिंग या विभागांमध्ये राष्ट्रीय खेळाडू म्हणून परिचित होत्या.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
त्यांनी खेळाच्या जोरावर इन्कम टॅक्स ऑफिसर पर्यंत मजल मारली आहे. तिचे वडील यशवंत जांभुळकर हे शेतकरी असून काळ्या आईची ते सेवा करतात. मयुरीचे प्राथमिक शिक्षण तळेगाव येथील सरस्वती विद्यामंदिर येथे झाले. पुढील शिक्षण डी फार्मसी तिने पुण्यामध्ये केले. त्या पदवीनंतर स्पर्धा परीक्षा दिल्या व यश संपादन करत प्रथम मागच्या वर्षी तलाठी म्हणून निवड झाली. त्यानंतर एमपी एससीची परीक्षा पास करून गटविकास अधिकाऱ्याच्या पदापर्यंत मजल मारली. तिच्या या यशामुळे मावळ तालुक्यात तिचं संपूर्ण कौतुक होत आहे. वहिले परिवार व जांभुळकर परिवार यांनी मयुरीला वेळोवेळी मार्गदर्शन लाभले.
वडगाव मावळमध्ये मधमाश्यांचा हल्ला
औद्योगिक क्षेत्रातील असलेल्या नवलाख उंब्रे हद्दीतील डोंगरावर सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या चौघांवर मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून तिघेजण जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि.६ मे) सकाळी घडली. हनुमंत बबूशा कोयते (44) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. दत्ता कडलक, लक्ष्मण कदम, एकनाथ धायबर (सर्व रा. नवलाख उंबरे, ता. मावळ) अशी जखमींची नावे आहेत.
भारत पाकिस्तान हल्ल्याच्या अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर
तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवलाख उंब्रे हद्दीतील डोंगरावर दररोज स्थानिक नागरिक मॉर्निंग वॉक सकाळी फिरण्यासाठी जातात. मंगळवारी सकाळी हनुमंत कोयते, दत्ता कडलक, लक्ष्मण कदम, एकनाथ धायबर हे चौघेजण मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. डोंगर चढत असताना डोंगरमधील तामकडा येथे अचानक चौघांवर मधमाश्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात हनुमंत कोयते यांचा मृत्यू झाला. तर तिघेजण जखमी झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मावळ तालुक्यात दिवसेंदिवस मोठ्या आकाराचे वृक्ष जीर्ण तसेच त्यांची तोड झाल्याने मधमाश्यांचे पोळे हे मावळातील उंच इमारतीला तसेच डोंगर कड्याला बसतात. त्यात मानवी हस्तपेक्ष झाल्यावर मधमाश्यांचा हल्ला नागरिकांवर होतो. एकविरा देवीच्या डोंगरावर असा प्रकार घडला होता. नवलाख उंब्रे हद्दीतील घटनेत एका व्यक्तीचा जीव गेल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.